ग्रीन- टीमध्ये पुदीना पाने आणि दालचिनी मिक्स करा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !

| Updated on: May 02, 2021 | 4:06 PM

नेकजण आपल्या सकाळची सुरूवात ग्रीन टी पिण्यापासून करतात. ग्रीन टी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

ग्रीन- टीमध्ये पुदीना पाने आणि दालचिनी मिक्स करा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !
Follow us on

मुंबई : अनेकजण आपल्या सकाळची सुरूवात ग्रीन टी पिण्यापासून करतात. ग्रीन टी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये अॅंटी-ऑक्सीडंट आणि पॉलीफेनॉल घटक असतात. तसेच ग्रीन टी ही तुमच्या त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, ग्रीन टीमध्ये पुदीना पाने आणि दालचिनी मिक्स करून पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते. (It is beneficial to mix mint leaves and cinnamon in green tea)

पुदीना पाने आणि दालचिनी
ग्रीन- टीमध्ये पुदीनाची पाने टाकल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि आपली भूक देखील कमी होते. यासारखे आरोग्यविषयक अनेक फायदे मिळतात. तसेच, दालचिनी देखील वजन कमी करण्यास मदत करते. पुदीन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदके, व्हिटामिन-ए, राइबोफ्लेविन, तांबे आणि लोह आढळतात. या पानांच्या सेवनाने उलट्या रोखता येतात आणि पोटातील गॅस देखील काढून टाकता येतो. तसेच, साठलेल्या कफावर देखील पुदिना उपयुक्त आहे.

पुदीना गरम प्रभावाचा आहे, ज्यामुळे तो शरीरातून घाम काढून ताप काढून टाकतो. आपल्याला एखादा किडा चावल्यास, त्याचे विष काढून करण्याचे गुणधर्म देखील पुदीन्यामध्ये आहेत. दालचिनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपल्या चेहर्‍यावरील मुरुम कमी होण्यास मदत होते.

ग्रीन टी सोबतच नियमित व्यायामही गरजेचा असतो. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायामासोबतच, फळ, पालेभाज्या यांचे सेवन करणे गरजेचे आहे. ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याला खूप जास्त गरम करु नका. त्यामुळे त्यात आवश्यक जीवनसत्त्व नष्ट होतात. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही पाणी गरम करुन 10 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टीचे पॅकेट कपात घेऊन त्यावर गरम पाणी टाका आणि 1 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर प्या.

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(It is beneficial to mix mint leaves and cinnamon in green tea)