AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मटार आता 1 किंवा 2 दिवस नाही तर वर्षभर राहतील फ्रेश; वापरा ‘ही’ सोपी पद्धत

तुम्हाला आवडणारे मटार प्रत्येकवेळी आता बाजारातून आणण्याची गरज नाही. ही एक सोपी ट्रीक वापरून तुम्ही एकदा आणलेले मटार चक्क वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता तेही अगदी फ्रेश. ताजे कसे ठेवावे याबद्दल सोपी पद्धत सांगितली आहे. मटार उकळत्या पाण्यात ब्लँच करून, नंतर बर्फाच्या पाण्यात ठेवून आणि पूर्णपणे वाळवून एअर-टाइट कंटेनरमध्ये साठवावे. यामुळे मटारचा रंग आणि पोषण मूल्य टिकून राहील आणि ते वर्षभर ताजे राहतील. ही पद्धत फ्रोजन मटारपेक्षा जास्त चांगली आणि पौष्टिक आहे.

मटार आता 1 किंवा 2 दिवस नाही तर वर्षभर राहतील फ्रेश; वापरा 'ही' सोपी पद्धत
| Updated on: Feb 12, 2025 | 8:06 PM
Share

अनेकांना जेवणात मटारची भाजी खूप आवडते. किंवा कधी इच्छा झाली की, पनीर मटार किंवा पावभाजी, मसालेभात आपण बऱ्याच प्रकरे मटारचा उपयोग करत असतोच. शिवाय हिवाळा म्हटलं की मटारचा सिजन. पण दरवेळी मटार आपल्या फ्रिजमध्ये असतीलच असं नाही. आणि दरवेळी बाजारात जाऊन ते विकत आणणं शक्य नाही. अशात लोकं फ्रोजन मटार विकत घेतात. ज्याला फ्रोजन पीस देखील म्हणतात. पण या फ्रोजन वाटण्यांना चांगली चव येत नाही, त्यामुळे ते खाण्याची मजा जाते. पण आज अशा काही ट्रीक्स जाणून घेणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही मटार चक्क वर्षभर म्हटलं तरी स्टोअर करू शकता तेही अगदी फ्रेश.

ब्लँचिंग करणे हा उत्तम उपाय 

मटार पौष्टिक असतातय यामध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी, फायबर, प्रोटीन देखील आढळतं, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण घरच्याघरी साठवून ठेवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे ते पाहुया. प्रथम हिरवे वाटाणे उकळत्या पाण्यात एक ते दोन मिनिटे ब्लँचिंग करा.ब्लँचिंग म्हणजे भाज्या उकळत्या पाण्यात किंवा थोड्या काळासाठी वाफेवर काढणे. त्यानंतर लगेच बर्फाच्या थंड पाण्यात हे मटार टाका. ही कृती केल्याने मटारचा हिरवा रंग टिकून राहील आणि त्यांचे पोषणमूल्यही जपले जाईल.

थंड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, स्वच्छ किचन टॉवेल किंवा पेपर नॅपकिन वापरून ते वाळवून घ्या. पूर्णपणे वाळल्यानंतर आता हे मटार एअर-टाइट झिप-लॉक कंटेनर, फ्रीझर-सेफ कंटेनर किंवा फ्रीझर बॅगमध्ये साठवले जाऊ शकतात.

आता थोडं सविस्तर पाहू

एका सॉसपॅनमध्ये 3 ते 4 लिटर पाणी उकळवून घ्या. पाणी चांगले उकळू लागले की, 1 चमचा मीठ, 2 चमचे साखर आणि 1 चिमूटभर बेकिंग सोडा घाला त्यामुळे त्याचा हिरवा रंग टिकून राहतो. पाणी उकळले की, त्यात मटार घाला आणि फक्त 2 मिनिटे उकळवून घ्या. उकळल्यानंतर, त्यांना ताबडतोब बर्फाच्या पाण्यात ठेवा. यामुळे बीन्स शिजवण्याची प्रक्रिया थांबेल आणि त्याच्या त्वचेवर सुरकुत्या पडणार नाहीत.

मटार पूर्णपणे वाळवणे ही सर्वात महत्वाची स्टेप आहे. त्यामुळे बर्फातील पाण्यातून काढल्यावर वाटाण्यांना स्वच्छ कापडावर ठेवा आणि हवेत वाळवा जेणेकरून ते एकत्र चिकटणार नाहीत आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यानंतरही वेगळे राहतील. या सोप्या पद्धतीचा अवलंब करून, तुम्ही वर्षभर ताजे वाटाणे वापरू शकाल आणि तुम्हाला बाजारातून फ्रोजन पॅकेटवर अवलंबून राहावे लागणार नाही.

View this post on Instagram

A post shared by @nehadeepakshah

ही एक सोपी स्टेप वापरून तुम्ही मटार वर्षभर स्टोअर करू शकता. मुख्य म्हणजे हे वाटाणे ताजे राहण्यास मदत होते. तसेच बाजारातून आणलेल्या फ्रोझन वाटाण्यांपेक्षा घरी अशा पद्धतीने बनवलेले वाटाणे कधीही उत्तम आणि पौष्टिक असतात. शिवाय तुम्हाला दरवेळी बाजारातून नव्यानं मटार आणण्याची आवश्यकता भासणार नाही. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही मटाराचा वापर करू शकाल.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.