घरी पौष्टिक पालक सूप बनविण्यासाठी या 5 स्टेप्स करा फॉलो, आजच करा ट्राय

| Updated on: Jun 27, 2021 | 7:56 AM

भाज्यांच्या सूपमध्ये आपल्याला जीवनसत्त्वे, खनिजे आणि उच्च प्रथिने मिळतील जे आपल्या आरोग्यास अफाट फायद्याचे ठरतील. या स्टेप्सचे अनुसरण करून आपण घरी सहज पालक सूप बनवू शकता. (Follow these 5 steps to make nutritious spinach soup at home, try it today)

घरी पौष्टिक पालक सूप बनविण्यासाठी या 5 स्टेप्स करा फॉलो, आजच करा ट्राय
पालकाचा रस
Follow us on

मुंबई : हिरव्या भाज्यांचा आहारात वापर करणे आरोग्यासाठी चांगले असते आणि भाज्यांच्या सूपबाबत म्हणाल तर हे सूप कोणाला आवडत नाही, असे नाही. लोक जवळजवळ सर्व कार्यक्रमांमध्ये सूपला प्राधान्य देतात. पाहुणचाराची ही एक शानदार पद्धत आहे. लोकांना ती खूप आवडते. आपल्याला लहान आणि मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये सूपच्या यादीची एक लाईन दिसेल. या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला सूपचे बरेच प्रकार आढळतील. बहुतांश लोकांना चिकन सूप अधिक आवडते. परंतु भाज्यांच्या सूपमध्ये आपल्याला जीवनसत्त्वे, खनिजे आणि उच्च प्रथिने मिळतील जे आपल्या आरोग्यास अफाट फायद्याचे ठरतील. या स्टेप्सचे अनुसरण करून आपण घरी सहज पालक सूप बनवू शकता. (Follow these 5 steps to make nutritious spinach soup at home, try it today)

पालक ही एक अशी भाजी आहे जी बहुतेक लोकांना आवडत नाही. त्यांना ही हिरवी पालेभाजी थोडी कडू वाटते आणि त्यांना तिचा गंध देखील आवडत नाही. पालक एक अतिशय लोकप्रिय भाजी नाही, परंतु त्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. हे रक्ताचे शुद्धीकरण करते, रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक देते.

स्टेप 1

2 वाटी पालक पाने घ्या आणि चांगली धुवा. त्यानंतर मोठी मोठी कापून एका बाजूला ठेवा.

स्टेप 2

भांड्यात थोडे लोणी गरम करुन त्यात एक तमालपत्र घाला. अर्धा कप बारीक चिरलेला कांदा आणि 2 चिरलेली लसूण पाकळ्या घाला. हे मंद आचेवर तळा.

स्टेप 3

नंतर चिरलेली पालकाची पाने घालून ढवळा. थोडे मीठ आणि मिरपूड सह शिजवा. त्यात अर्धा कप दूध आणि 2 कप पाणी घाला. त्यानंतर ते उकळी येऊ द्या.

स्टेप 4

आंच बंद करा आणि हे थंड होऊ द्या. हे मिश्रण स्मूद कंसिस्टन्सी येईपर्यंत हँड ब्लेंडरने ब्लेंड करा. मिक्स करण्यापूर्वी यातून तमालपत्र काढा.

स्टेप 5

ते एका पात्रात ट्रान्सफर करा आणि काही मिनिटे उकळवा आणि नंतर गरम गरम सर्व्ह करा.

या पाच स्टेप्सचे अनुसरण करून घरच्या घरी चवदार आणि पूर्णपणे निरोगी पालक सूप बनवा. हे आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह संध्याकाळी उत्कृष्ट डिशच्या स्वरुपात म्हणून समाविष्ट करू शकता. (Follow these 5 steps to make nutritious spinach soup at home, try it today)

इतर बातम्या

मेकअप किटमध्ये ‘हे’ ब्युटी प्रॉडक्ट्स अवश्य ठेवा; सौंदर्यासाठी ही काळजी घेतलीच पाहिजे

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदीत 7 दिवस संचारबंदी, सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार