AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 3 प्रकारे तुमच्या आहारात नाचणीचा करा समावेश, आरोग्याला मिळतील फायदेच फायदे

नाचणीमध्ये विविध पोषक तत्वे आणि खनिजे भरपूर असल्याने त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तुम्ही नाचणी पासून हे तीन पदार्थ बनवून तुमच्या आहारात विविध प्रकारे समाविष्ट करू शकता.

'या' 3 प्रकारे तुमच्या आहारात नाचणीचा करा समावेश, आरोग्याला मिळतील फायदेच फायदे
चांगल्या आरोग्यासाठी नाचणीपासून बनवा 'हे' 3 प्रकारचे निरोगी आणि चविष्ट पदार्थ, जाणून घ्या ही सोपी रेसिपीImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Sep 22, 2025 | 8:59 PM
Share

आजकाल बदलत्या जीवनशैलीत आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आहारात अनेक बदल करत असतात. तर काहीजण गव्हाऐवजी मल्टीग्रेन धान्य, बाजरी, नाचणी आणि ज्वारी यांचा आहारात समावेश करतात जेणेकरून त्यांच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतील. काहीजण अधिक करून नाचणीचा समावेश करतात. कारण नाचणीचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोकांना नाचणीच्या पीठापासून बनवलेली भाकरी खायला खूप आवडते. पण तुम्ही तुमच्या आहारात नाचणी पासून अनेक चविष्ट पदार्थ बनवू शकता. जे तुमच्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

तर नाचणी हे कॅल्शियम आणि लोहाचा खूप चांगला स्रोत आहे. त्यामुळे हाडे मजबूत करण्यास मदत होते. तसेच पचायला सोपी आणि भूक नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते. तर तुम्ही नाचणीपासून हे चविष्ट पदार्थ बनवून तुमच्या आहारात या प्रकारे समाविष्ट करू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण नाचणीपासून कोणते पदार्थ बनवू शकतो ते जाणून घेऊयात..

नाचणीपासून खिचू बनवा

खिचू हे एक गुजराती नाश्त्याचा प्रकार आहे, जो तांदळांच्या पिठापासून तयार केला जातो. पण तुम्ही नाचणीच्या पिठापासून खिचू बनवू शकता. प्रथम एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करा, त्यात 1टीस्पून हिंग आणि १ कप पाणी घाला. १ टीस्पून आले आणि हिरव्या 1/2 मिरचीची पेस्ट, मीठ, 1/4 कप बारीक चिरलेली गाजर आणि 1/4 कप बीन्स टाका आणि मऊ होईपर्यंत शिजवा. त्यानंतर 1 कप नाचणीचे पीठ 2 कप पाण्यात मिक्स करा आणि पॅनमध्ये पीठ टाका आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवत राहा. ते एका प्लेटमध्ये काढा. त्यावर थोडे तेल किंवा तूप टाका.. बारीक चिरलेली कोथिंबीर, लोणचे मसाला टाका आणि गरमागरम सर्व्ह करा.

नाचणीची इडली

तुम्ही नाचणीपासून इडली बनवू शकता. तर इडली बनवण्यासाठी, एका भांड्यात नाचणीचे पीठ आणि रवा समान प्रमाणात एकत्र चांगले मिक्स करा. 1 कप दही आणि मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव करा आणि 15 मिनिटे झाकन ठेऊन तसेच राहू द्या. हलके आणि फुललेले होईपर्यंत पीठ चांगले फेटून घ्या, किंवा तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही चिमूटभर इनो टाकू शकता. इडलीच्या साच्यांना तेलाने ग्रीस करा आणि त्यात पीठ टाका आणि 15 ते 20 मिनिटे वाफेवर शिजवा. एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करा, त्यात 1 चमचा मोहरी, चिमूटभर हिंग आणि कढीपत्ता टाका. 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1/4 कप चिरलेला कांदा, 1/4 कप चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेले टोमॅटो टाका. लाल तिखट, मीठ आणि हळद टाका. 2 ते 4 मिनिटे परतून घ्या. टोमॅटो मऊ झाल्यावर नाचणीची इडली त्यात मिक्स करा. गरमगरम सर्व्ह करा.

नाचणीचे सँडविच

तुम्ही मुलांसाठी नाचणीपासून सँडविच बनवू शकता. ते बनवण्यासाठी एका पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवा. 1 कप नाचणी पीठ त्यात टाका आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे शिजवा. हे मिश्रण एका भांड्यात ठेवा, मऊ पीठ मळून घ्या आणि 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर पीठाचे बारीक गोळे तयार करून चपाती प्रमाणे लाटून घ्या आणि पॅनवर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. नंतर नाचणीपासून बनवलेल्या या पोळीवर हिरवी चटणी लावा आणि वर उकडलेले बटाट्याचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे, कांद्याचे तुकडे, काकडीचे तुकडे, किसलेले चीज आणि चाट मसाला टाका आणि त्याचे सँडविच बनवा. पॅनवर तुप टाकून नाचणीचे हे सँडविच दोन्ही बाजूने टोस्ट करा आणि चटणीसोबत गरम सर्व्ह करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.