AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज सकाळी आलं, मध आणि लिंबाचे पाणी प्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

कोरोनाच्या काळात आजारांपासून दूर राहणे आता गरजेचे झाले आहे.

दररोज सकाळी आलं, मध आणि लिंबाचे पाणी प्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 06, 2021 | 8:01 AM
Share

मुंबई : कोरोनाच्या काळात आजारांपासून दूर राहणे गरजेचे झाले आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे चांगली रोगप्रतिकारक शक्ती यासाठी आपल्याला चांगला आणि हेल्ही आहार घ्यावा लागणार आहे. जेणे करून आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्की मदत होईल. (Ginger, honey and lemon are beneficial for boosting the immune system)

-मध

-लिंबू

-आद्रक

-पाणी

सर्वात अगोदर पाणी गरम होण्यासाठी मंद आचेवर ठेवा. त्यानंतर यामध्ये आद्रक आणि मध घाला. साधारण 20 ते 25 मिनिटे हे उकळूद्या आणि त्यानंतर यामध्ये लिंबू घ्याला प्या. मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो.

खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. आपण एखादा चमचा नुसता मधही खाऊ शकता. याशिवाय आल्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्याने कफ आणि खोकल्यात खूप आराम मिळतो.

लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा अधिक असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. थकवा दूर करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो. सध्याचा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तर दररोज आहारामध्ये लिंबाचा समावेश करणे आवश्यक आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते. तसेच आजार लवकर बरा होण्यासही मदत मिळते. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीचे दूध आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते. ज्यामुळे आपले आरोग्य देखील निरोगी राहते.

संंबंधित बातम्या : 

Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!

(Ginger, honey and lemon are beneficial for boosting the immune system)

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी