Belly fat : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ खास उपाय करा आणि स्लिम व्हा!

| Updated on: Mar 02, 2022 | 1:34 PM

वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोक अनेक मार्गांनी प्रयत्न करतात. आपण देखील त्यापैकी एक असाल तर आपण काही गोष्टींचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये (Diet) समावेश करून वजन कमी करू शकता. मात्र, अनेकांचे म्हणणे असते की, पोटावरील चरबी व्यायाम आणि डाएट करून देखील जात नाही.

Belly fat : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हे खास उपाय करा आणि स्लिम व्हा!
पोटावरील चरबी करण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर
Follow us on

मुंबई : वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोक अनेक मार्गांनी प्रयत्न करतात. आपण देखील त्यापैकी एक असाल तर आपण काही गोष्टींचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये (Diet) समावेश करून वजन कमी करू शकता. मात्र, अनेकांचे म्हणणे असते की, पोटावरील चरबी व्यायाम आणि डाएट करून देखील जात नाही. आज आम्ही तुम्हाला पोटावरील चरबी (Belly fat) कमी करण्यासाठी काही खास उपाय सांगणार आहोत. जे उपाय आपण फाॅलो करून मस्त स्लिम होऊ शकता. जर वजन कमी करायचे असेल तर डाएटमधून काजू दूर करावे लागतील.

  1. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्या. यामुळे झटपट पोटावरील चरबी कमी होईल. तसेच लिंबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.
  2. जर तुम्हाला पोटाची चरबी आणि शरीरातील चरबी काढून टाकायची असेल, तर तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट आणि साखर काढून टाकण्याची गरज आहे. कमी चरबीयुक्त अन्नानेही वाढलेले वजन कमी करता येते.
  3. प्रथिनेयुक्त बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते, जे आपल्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय राखण्यास मदत करते. यामुळे पोटाच्या आसपासची चरबी कमी होते.
  4. दोरीवरच्या उड्या ह्या शकतो सकाळच्या वेळीच मारल्या पाहिजे. यामुळे वजन कमी करण्यासाठी अधिक फायदा होतो. चालणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. सोपा आणि उत्तम व्यायाम म्हणजे चालणे होय. जे लोक दररोज फिरायला जातात. त्यांना जीवघेण्या आजारांचा होण्याचा धोका कमी असतो. हा व्यायाम केल्याने तुमची रक्तातील साखर नियंत्रित होते.
  5. तणावामुळे शरीरात कोर्टिसॉल हार्मोनचे प्रमाण वाढते, जे चयापचय कमी करण्यास मदत करते. जर आपला चयापचय दर कमी असेल तर वजन कमी करणे कठीण आहे. दररोज एक ग्लास ताकाचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

पोटच नाही तर मेंदूला सुद्धा इजा पोहोचवतात हे काही पदार्थ, जाणून घ्या आणि सावध व्हा !

कानाशी निगडीत ही काही लक्षणे जाणवताच चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमचे बहिरेपण येऊ शकते!