AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Constipation Remedies : बद्धकोष्ठतेमुळे हैराण आहात? तर मग ‘या’ पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!

बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेचा (Constipation Remedies) सामना करावा लागतो आहे. पुरेशा प्रमाणात फायबर आपल्या शरीराला मिळाले नाही की, शक्यतो बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. जर आपण आपल्या आहारामध्ये (Diet) जास्तीत-जास्त प्रमाणात फायबरचा समावेश केला तर ही समस्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल.

Constipation Remedies : बद्धकोष्ठतेमुळे हैराण आहात? तर मग 'या' पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!
बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर आहे.
| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 10:53 AM
Share

मुंबई : बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेचा (Constipation Remedies) सामना करावा लागतो आहे. पुरेशा प्रमाणात फायबर आपल्या शरीराला मिळाले नाही की, शक्यतो बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. जर आपण आपल्या आहारामध्ये (Diet) जास्तीत-जास्त प्रमाणात फायबरचा समावेश केला तर ही समस्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल. बद्धकोष्ठतेमुळे तुम्हाला दिवसभर सुस्त आणि आजारी वाटते. यादरम्यान भूक न लागणे, डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. पोट साफ न राहिल्यामुळे अनेक वेळा त्वचेशी संबंधित समस्या जसे पिंपल्स देखील होतात. अशा परिस्थितीत फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. हे पदार्थ (Foods) बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यास मदत करतात.

  1. केळ अत्यंत फायदेशीर केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. केळी तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
  2. काळे मनुके रात्री भिजवून सकाळी काळे मनुके खाणे खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन बी आणि सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
  3. पाणी पुरेसे पाणी प्या. अधिकाधिक पाण्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पाणी आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करते. तसेच त्वचा निरोगी राहते.
  4. हिरव्या पालेभाज्या ब्रोकोली, पालक यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते. ते फोलेट, व्हिटॅमिन सी आणि के सारख्या पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहेत. ते आतडे निरोगी ठेवतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही या भाज्यांचे सेवन देखील करू शकता.
  5. मुळा मुळा फायबरने समृद्ध असतो. हे आतड्यासाठी चांगले आहे. तुम्ही याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. मुळा तुम्ही सांभर आणि भाज्यांमध्ये देखील वापरू शकता. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
  6. दही दह्यामध्ये कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. प्रोबायोटिक्ससारखे चांगले बॅक्टेरिया दह्यामध्ये आढळतात.

संबंधित बातम्या : 

पोटच नाही तर मेंदूला सुद्धा इजा पोहोचवतात हे काही पदार्थ, जाणून घ्या आणि सावध व्हा !

कानाशी निगडीत ही काही लक्षणे जाणवताच चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमचे बहिरेपण येऊ शकते!

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?