AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकअपनंतरही हे विचार मनात येत असतील तर ते विचार दूर करा आणि पुढे जात राहा, त्यासाठी या टिप्स फॉलो करा…

मुंबईः ब्रेकअप (Breakup) झाल्यानंतर, बहुतेक लोकांना पुढच्या गोष्टींची माहिती असते की, आता तिच्याशिवाय किंवा त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जावे लागणार आहे. तरीही काही माणसं जुन्या गोष्टीत नको इतकी ती अडकून पडलेली असतात. कधी कधी परिस्थिती इतकी बिघडते की लोकांना नैराश्यही येते. ब्रेकअपनंतर तुम्हाला नैराश्य (Depression) येऊ नये यासाठीच आम्ही काही सोप्या टिप्स देत आहोत, त्या नक्की […]

ब्रेकअपनंतरही हे विचार मनात येत असतील तर ते विचार दूर करा आणि पुढे जात राहा, त्यासाठी या टिप्स फॉलो करा...
breakupImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 9:54 PM
Share

मुंबईः ब्रेकअप (Breakup) झाल्यानंतर, बहुतेक लोकांना पुढच्या गोष्टींची माहिती असते की, आता तिच्याशिवाय किंवा त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जावे लागणार आहे. तरीही काही माणसं जुन्या गोष्टीत नको इतकी ती अडकून पडलेली असतात. कधी कधी परिस्थिती इतकी बिघडते की लोकांना नैराश्यही येते. ब्रेकअपनंतर तुम्हाला नैराश्य (Depression) येऊ नये यासाठीच आम्ही काही सोप्या टिप्स देत आहोत, त्या नक्की फॉलो करा, आणि दुःख विसरुन आयुष्यात पुढे जा…

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम (Love) ही घटना घडते, त्यातून आनंद, दुःख हे सगळं मिळत असले तरी जी माणसं प्रेमात ब्रेकअप झाल्यानंतरही ती त्यातून बाहेर पडत नाहीत, ती त्याच दुःखात अडकून पडलेली असतात. ब्रेकअप झालेल्या माणसाला त्याच्या जुन्या आठवणी छळत असतात, आणि अशी माणसं त्याच आठवणी गोंजरत बसत असतात. नातेसंबंध संपले किंवा संपुष्ठात येण्यास अनेक कारणे कारणीभूत असतात. त्याचा अर्थ असा नाही की, त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात प्रचंड नुकसान करुन घ्या. त्याची ही बाजू ही असते झाले गेलेले विसरुन तुम्ही पुढे चालत राहिले पाहिजे.

नैराश्यग्रस्त होऊ नका

ब्रेकअप झाल्यानंतर अनेकांना माहिती असते की, आपण आता झाले गेलेले विसरुन पुढे गेले पाहिजे. तरीही काही माणसं भावनिक असतात, ती माणसं त्याच जुन्या गोष्टीत अडकून पडलेली असतात. त्यातून अशा माणसांना नैराश्य येते, आणि आयुष्यात सावरले गेले नाही तर मग प्रचंड नुकसान होते.

आपल्या माणसांसोबत वेळ घालवा

प्रेमाच्या आयुष्यात ब्रेकअप झाला की, सगळं संपलं आहे असा विचार करणे चुकीचे आहे, आणि त्यासाठी काही तरी नुकसान करुन घेणेही चूक आहे. त्यामुळे अशा काळात तुम्हाला तुमच्यासोबत राहणारी माणसं असतात ती तुमच्या कुटुंबातील. त्यामुळे ब्रेकअप झाले तर आपल्या माणसांतून थांबा, त्यांच्याबरोबर तुमचे सुख दुःख शेअर करा. तुम्हाला जास्त ओळखणारे कोण असते तर तुमच्या कुटुंबातील माणसं. त्यामुळे त्यांच्यातून बसून भावनिकरित्या मोकळे व्हा. घरातील मंडळी सोबत असतील तर तुमचा एकटेपणा कधीच दूर गेलेला असतो.

चित्रपट पाहण्याची संधी सोडू नका

प्रेमात पडलेल्या माणसाला चित्रपट, गीत, संगीत हे दोन्ही प्रचंड आवडत असते. या आवडीचा फायदा तुमच्या एकटेपणात होत असतो. ब्रेकअप झाले असेल तर तुम्हाला ही तुमची आवड नक्कीच मदत करु शकते. ब्रेकअपनंतर तुम्हाला एकटेपणा वाटत असेल, एकटेपणा जाणवत असेल तर तुम्ही चित्रपट, वेबसिरिज किंवा गाणी ऐकू शकता. आजकाल असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत, जिथे भरपूर चित्रपट आणि वेब सिरीज आहेत. जर तुम्हाला चित्रपट किंवा वेब सिरीज पाहण्याची आवड असेल तर ही टिप तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते.

सतत व्यस्त राहा

असं म्हणतात की, प्रेम झालं की, सगळं जग गुलाबी दिसू लागतं म्हणजेच सगळं जग आनंदी वाटू लागतं पण त्याच प्रेमात जर ब्रेकअप झाले तर त्याच्यासारखं दुःख मग येत नाही. त्या प्रेमाच्या जुन्या आठवणी तुम्हाला स्वस्त बसू देत नाहीत. तुम्ही ज्या ज्या वेळी रिकामं असाल त्या त्या वेळी तुम्हाला तिची किंवी त्याची प्रचंड आठवण येते. त्याचा तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या कामामध्ये गुंतवून घ्या. पुस्तक वाचा, गाणी ऐका, चित्रपट पाहा, घराच्यासोबत दिवस घालवा त्यामुळे ब्रेकअपच्या दुःखातून तुम्ही बाहेर पडाल. आणि तुम्ही ते दुःख विसरुन जाऊ शकाल.

जुन्या आठवणीत रमू नका

प्रेम ही गोष्ट आनंददायी असली तरी ती निघून गेल्यानंतर मात्र माणसाला अतीव दुःख होते. प्रेम करणाऱ्या जोडीदारांचे कदाचित ब्रेकअप झाले तर मात्र ते अतिदुःखात असतात. ब्रेकअप झाले असेल आणि तुम्ही तिला किंवा त्याला विसरु पाहात असाल तर तुमच्याजवळच्या त्या प्रेमातील जुन्या गोष्टींना जवळ ठेवू नका. गिफ्ट, वस्तू, डायरी अशा या प्रेमातील वस्तू तुमच्या जवळ असतील तर त्या दूर करा आणि दुःखातून बाहेर पडून आनंदी जीवन जगा.

संबंधित बातम्या

कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा, तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल!

जास्त मीठाचं सेवन करताय? आजच आहारातून कमी करा, टक्कल पडण्यासोबतच अनेक दुष्परिणाम…

वारंवार खाजेमुळे तुमचा ‘बिअर्ड लूक’ बिघडतोय? हे घ्या घरगुती उपाय…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.