पावसाळ्यात आरोग्याची काळजी वाटतेय? मग, आहारात ‘हे’ पदार्थ सामील करा आणि निश्चिंत व्हा!

| Updated on: Aug 13, 2021 | 4:00 PM

पावसाळ्यात संसर्गाचा धोका अधिक वाढतो. पावसाळ्यात कडक उन्हापासून आराम मिळतो, पण सोबतच इन्फेक्शन, फ्लू आणि सर्दी होण्याची शक्यता देखील अधिक असते. अशा परिस्थितीत आपल्या आहारात अनेक प्रकारचे आरोग्यदायी पदार्थ समाविष्ट केले जाऊ शकतात.

पावसाळ्यात आरोग्याची काळजी वाटतेय? मग, आहारात ‘हे’ पदार्थ सामील करा आणि निश्चिंत व्हा!
हेल्दी फूड
Follow us on

मुंबई : पावसाळ्यात संसर्गाचा धोका अधिक वाढतो. पावसाळ्यात कडक उन्हापासून आराम मिळतो, पण सोबतच इन्फेक्शन, फ्लू आणि सर्दी होण्याची शक्यता देखील अधिक असते. अशा परिस्थितीत आपल्या आहारात अनेक प्रकारचे आरोग्यदायी पदार्थ समाविष्ट केले जाऊ शकतात. या पदार्थांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि संसर्गाशी लढण्यास मदत होईल. चला तर, जाणून घेऊया अशा कोणत्या 10 पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकता.

हिरव्या मिरच्या

हिरव्या मिरचीमध्ये पिपेरिन असते, जे एक अल्कलॉइड आहे, ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात व्हिटामिन सी आणि केचे समृद्ध प्रमाण देखील आहे. हिरव्या मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतट. तसेच, अनेक गंभीर आजार टाळण्यास मदत करू शकतात. हिरव्या मिरच्या हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे उत्पादन उत्तेजित करून, वायू कमी करू शकतात, ज्यामुळे पचन सुधारते. यात अँटीमाइक्रोबियल गुणधर्म देखील आहेत.

फळे

पीच, प्लम, चेरी, बेरी, डाळिंबासारखी हंगामी फळे जीवनसत्त्वे ए आणि सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. मात्र, रस्त्याच्या कडेला आधीच कापून ठेवलेली फळे आणि ज्यूस खाणे टाळा. स्वच्छ धुवून, ताजे कापलेले फळ आणि घरगुती बनवलेले ज्यूसच सेवन करा.

पेय

सूप, मसाला चहा, ग्रीन टी, मटनाचा रस्सा, डाळींचे सूप इत्यादी गरम द्रवपदार्थांचा आहारात समावेश करा. ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

भाज्या

हा दुधीचा हंगाम आहे. अशा स्थितीत दुधीपासून बनवलेल्या अनेक पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. यामध्ये पराठे, सूप, रायता आणि भाज्या इत्यदी स्वरुपात दुधीचे सेवन करू शकता. कच्च्या भाज्यांऐवजी उकडलेले सलाड खा. कारण या काळात कच्च्या भाज्यांवर सक्रिय बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन होऊ शकते.

प्रोबायोटिक्स

आपले पोट निरोगी ठेवण्यासाठी दही, ताक, लोणची यासारख्या प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करा. हे प्रोबायोटिक्स आतड्यात चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत करतात, जे आतड्यातून खराब बॅक्टेरिया किंवा रोग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात.

प्रथिने

निरोगी प्रथिने आपल्या आहारात समाविष्ट केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हे आपल्याला आजारातून लवकर बरे होण्यास मदत करतात. दूध, मूग, मसूर, चणे, राजमा, सोया, अंडी आणि चिकन हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.

आले आणि लसूण

आले आणि लसूण सर्दी आणि तापाशी लढायला मदत करतात. यात अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. त्यांच्यामध्ये दाहक-विरोधी, प्रतिजैविक आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. आल्याचा चहा घशातील वेदना कमी करण्यास मदत करू शकतो. हे घटक ग्रेव्ही, चटणी, सूप, चहा इत्यादीमध्ये मिसळता येतात.

मेथी

मेथी हा शरीराची ऊर्जा वाढवणारा घटक आहे. त्यात आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे असतात. हे ताप आणि पाचन तंत्र निरोगी ठेवण्यास मदत करते.

हळद

हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. यात अँटीऑक्सिडेंट, अँटीमाइक्रोबियल प्रभाव आहे, ते गॅस्ट्रिक अल्सर प्रतिबंधित करते आणि प्रतिकारशक्ती सुधारते.

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड शरीराला आवश्यक असणारे फॅटी अ‍ॅसिड आहेत. पावसाळ्यात संसर्गाचा धोका वाढतो. अशावेळी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि संसर्गाशी लढण्यास हे अ‍ॅसिड मदत करतात. यासाठी तुम्ही ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचे समृद्ध प्रमाण असणारे मासे, अक्रोड, पिस्ता, चिया बियाणे, अंबाडी, इत्यादी खाऊ शकता.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

हेही वाचा :

झटपट वजन कमी करतील ‘या’ 5 खिचडी, आठवड्यातून दोनदा खाल्ल्यास देखील दिसतील परिणाम!

Health Tips : या 5 औषधी वनस्पती मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास करू शकतात मदत