पैसे खर्च करण्यापेक्षा आता घरी छोट्याशा कुंडीतच हिरवीगार कोथिंबीर कशी पिकवाल? तेही झटपट

सतत बाजारातून कोथिंबीर विकत आणण्यापेक्षा ती घरच्या घरीच पिकवणे आता अगदी सोपे झाले आहे. घरी छोट्याशा कुंडीतही तुम्ही हिरवीगार कोथिंबीर पिकवू शकता. तेही अगदी झटपट आणि अत्यंत कमी खर्चा. वापरा ही सोपी ट्रिक

पैसे खर्च करण्यापेक्षा आता घरी छोट्याशा कुंडीतच हिरवीगार कोथिंबीर कशी पिकवाल? तेही झटपट
| Updated on: Mar 02, 2025 | 12:54 PM

भारतातील प्रत्येकाच्या घरात कायमच कोथिंबीरही ही असतेच. त्याशिवाय भाजीचं चव असो किंवा घरी बनवलेल्या भेळेची चव ती अपूर्णच राहते. पण ऋतू प्रमाणे कोथिंबीर जास्त महागही होतात. पावसाळा आणि उन्हाळी हंगामात बाजारात पुरवठा कमी झाला की कोथिंबीरीची जुडी थेट 100 आणि 200 रुपयाच्या घरात जातात. त्यामुळे लोकांना महागडे कोथिंबीरही खरेदी करावी लागते. अशा परिस्थितीत,जर तिच कोथिंबीर आपण घरीच वाढवली ​​तर पैसे तर वाचतिलच पण शिवाय शुद्ध आणि ताजी हिरवी कोथिंबीरही मिळेल.

घरच्या घरी कोथिंबीर उगवण्यासाठी अत्यंत कमी खर्च

घरच्या घरी कोथिंबीर उगवण्यासाठी फार काही करण्याची आवश्यकताही नसते. अगदी घरातच असलेल्या छोट्याशा कुंडीतही तुम्ही कोथिंबीर लावू शकता. अगदी सोप्या पद्धतीने कसं ते पाहुयात. फक्त कोथिंबीर लावताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कमीत कमी वेळात कोथिंबीर घरी लावण्याची सोपी ट्रिक पाहूया.

धणे हेच कोथिंबिरीचं बी असतं. आणि प्रत्येकाच्या घरात धणे हे असतातच. धणे किंचित भिजवून ते नंतर कुंडीत पेरा. चांगल्या प्रतीचे धणे पेरा म्हणजे छान सुगंधी कोथिंबीर उगवते.कोथिंबीर घरच्याघरी लावणंसुद्धा अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला कोणताही जास्तीचा खर्च करावा लागणार नाही.

फक्त 10 ते 20 रुपयांचा खर्च

कोथिंबीरीच्या रोपासाठी अशी जागा निवडा. ज्या ठिकाणी सकाळचा सुर्यप्रकाश येत असेल. कारण या सुर्यप्रकाशात जास्त उष्णता नसते. कोथिंबीर लावण्यासाठी तुम्ही जे भांडं निवडता त्याच्या तळाशी भरपूर छिद्र असतील हे पाहा. कोथिंबीरीसाठी सुपीक मातीची आवश्यकता असते. बियाणे पाण्यात भिजवून नंतर मातीत पेरा. भांड्यात एक भाग वाळू आणि एक भाग गांडूळखत घाला. आणि ही माती तुम्हाला अगदी 10 ते 20 रुपयांपर्यंत कोणत्याही नर्सरीवाल्याकडे मिळून जाईल.

लवकरच कोथिंबिरीची छोटी रोपं उगवतील अन्….

किंवा जर तुमच्या कडे एकादी वाळलेल्या रोपट्याची कुंडी असेल तर त्याच कुंडीतील माती उकरून ती भुसभुशीत करून त्यात जरी दाणे पेरले तरी चालेल. कोथिंबीर लवकर आणि वेगानं वाढवण्यासाठी धणे पेरताना ते आधी लाटण्याचे किंचित रगडून घ्या. फार भुगा करायचा नाही. त्याचे दल वेगळे होतील असं हलक्या हाताने त्यांच्यावर दाब द्यायचा. आणि मग ते मातीत पेरा त्याला रोज थोडे थोडे पाणी घालत जा. लवकरच कोथिंबिरीची छोटी रोपं उगवतील. आणि काही दिवसात कोथिंबीर कापण्यासाठी देखील तयार होईल.

मात्र यानंतर तुम्हाला बाहेर बाजारात जाऊन कोथिंबीर खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत आणि हवं तेव्हा तुम्ही ताजी कोथिंबीर तोडून वापरू शकता.