Health care tips : उन्हात निरोगी राहण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामाला सुरूवात झाली आहे. मात्र, डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. तसेच याकाळात त्वचेच्या (Skin) अनेक समस्या निर्माण होतात. उष्माघाताबरोबरच ताप, अन्नातून विषबाधा, पोटाचा त्रास, जुलाब अशा समस्यांचे प्रमाणही अधिक वाढते.
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी या टिप्स फायदेशीर आहेत.
मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामाला सुरूवात झाली आहे. मात्र, डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. तसेच याकाळात त्वचेच्या (Skin) अनेक समस्या निर्माण होतात. उष्माघाताबरोबरच ताप, अन्नातून विषबाधा, पोटाचा त्रास, जुलाब अशा समस्यांचे प्रमाणही अधिक वाढते. थकवा शरीरात लवकर येतो. दहा मिनिटे जरी घराबाहेर या हंगामात पडले की, लगेचच डोकेदुखीची (Headache) समस्या देखील निर्माण होते. त्यामुळे उन्हात निरोगी राहण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल.
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी खालील टिप्स फायदेशीर
-दिवसभर भरपूर पाणी प्या. पण फ्रिजमधलं पाणी पिण्याची गरज नाही. फ्रीजच्या पाण्यात साधे पाणी मिक्स करून पिले तरीही चालते. प्रत्येक 30 मिनिटांनी पाणी प्या. तसेच आपण पण नारळ पाणी आणि फळांचा रस देखील पिऊ शकतो. शरीरातील ओलावा टिकवून ठेवणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा डिहायड्रेशन सारखी समस्या उद्भवते.
-उष्माघाताच्या लक्षणांमध्ये ताप, मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ आणि नाक वाहणे यांचा समावेश होतो. तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असल्यास, प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
-आरामदायक सुती कपडे घाला. जेणेकरून शरीराला जास्त घाम येत नाही. तसेच, जड, कृत्रिम वस्तू टाळा. विनाकारण घराबाहेर पडू नका. रात्री 10 नंतर पण अजिबात नाही. ज्येष्ठांनी उन्हात बाहेर पडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
-घराबाहेर कुठेही खाणे चांगले नाही. त्यामुळे पचनाचा त्रास होतो, पोटाचा त्रास होतो. टोमॅटो, काकडी, बटाटा, भोपळा, स्क्विड या भाज्या अधिक प्रमाणात खा. कलिंगडचा आणि लिंबाचा रस सतत घ्या. हवामानात डोळ्यांच्या विविध ऍलर्जी होतात. आणि म्हणून सनग्लासेससोबतच ठेवा. बाहेरून परत स्वच्छ पाण्याने डोळे स्वच्छ धुवा.
-या हंगामात आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि डाळींचा समावेश करा. यामुळे आपले शरीराला ऊर्जा मिळण्यासही मदत होते. तसेच फास्ट फूड आणि बाहेरील खाद्यपदार्थ खाणे पूर्णपणे बंदच करा. ज्यूस देखील बाहेरचा प्यायचा नाही. घरीच फळांचा ताजा ज्यूस करून प्या.
(वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे, tv9 याचा दावा करत नाही)