AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रमजामदरम्यान मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास तज्ज्ञांचे मार्गदर्शन, वाचा सविस्तरपणे!

रमजानचा (Ramzan) पवित्र महिना सुरू असल्याने लोक दिवसभर उपवास करतात. ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही खात किंवा पित नाहीत. हा उपवास करत असलेले सूर्यास्तानंतर इफ्तार प्रथेचा भाग म्हणून उपवास मोडू शकतात. सलग 30 दिवसापर्यंत काहीही न खाता किंवा पिता उपवास करणे आव्हानात्मक आहे.

रमजामदरम्यान मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास तज्ज्ञांचे मार्गदर्शन, वाचा सविस्तरपणे!
मधुमेहाच्या रूग्णांनी रमजानमध्ये आरोग्याची अशाप्रकारे काळजी घ्यावी.
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 3:24 PM
Share

मुंबई : रमजानचा (Ramzan) पवित्र महिना सुरू असल्याने लोक दिवसभर उपवास करतात. ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही खात किंवा पित नाहीत. हा उपवास करत असलेले सूर्यास्तानंतर इफ्तार प्रथेचा भाग म्हणून उपवास मोडू शकतात. सलग 30 दिवसापर्यंत काहीही न खाता किंवा पिता उपवास करणे आव्हानात्मक आहे. म्हणूनच मधुमेहाने (Diabetes) पीडित व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आणि त्यांच्या रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे योग्य आहाराचे (Food) सेवन करणे आवश्यक आहे. उपवासाचे स्वरूप आणि या सणादरम्यान सेवन केले जाणारे खाद्यपदार्थ पाहता उपवास करत मधुमेहावर नियंत्रण ठेवणे अत्यंत अवघड आहे.

जोशीदेव डायबिटीज रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. ज्योतीदेव केशवदेव म्हणाले, “मधुमेह या आजारामध्ये नियमितपणे देखरेख करणे आणि रक्तातील शर्करेच्या पातळ्या सामान्य रेजमध्ये राहण्यासोबत त्यामध्ये किमान चढ-उतार होण्याची काळजी घेण्याची गरज भासते. रमजानदरम्यान मधुमेहाने पीडित व्यक्तींची सतत तपासणी होणे गरजेचे आहे. कारण ते 10 ते 112 तासांपेक्षा अधिक वेळ उपवास करतात.”

आरोग्यदायी जीवनशैली राखणे महत्वाचे

आज सतत ग्लुकोजवर देखरेख ठेवणारे डिवाईस उपलब्ध आहेत, जे मधुमेहाने पीडित व्यक्तींना त्यांचे 24 तास ग्लुकोज प्रोफाइल समजण्यास मदत करतात. एखादी व्यक्ती सतत ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टिम्सचा वापर करू शकते, जे अनेक वेळा होणा-या वेदनांना प्रतिबंध करण्यामध्ये मदत करतात आणि अधिक जलद व अचूक आहेत. हे अत्यंत सोईस्कर वी अरेबल्स आहेत जसे की फ्रीस्टाइल लिब्रे, जे रिअल-टाइम ग्लुकोज रिडिंग्ज दाखवते, ज्यामधून इफ्तारदरम्यान किंवा सेहरीच्या वेळी ग्लुकोज घ्यावे. रोजादरम्यान संतुलित आहार सेवन करणे आणि आरोग्यदायी जीवनशैली राखणे तितकेच महत्त्वाचे आहे.

यासंदर्भात काही सूचना पुढीलप्रमाणे

इफ्तार व सेहरीदरम्यानचे भोजन कर्बोदकांनी संपन्न आणि शरीरामध्ये सहजपणे पचेल अशा खाद्यपदार्थासह इफ्तार भोजन सेवन करा जसे 1 ते 2 खजूर किंवा दूध, जटिल कर्बोदके जसे ब्राऊन राईस व चपाती. सेहरीदरम्यान एखादी व्यक्ती तृणधान्ये, भाज्यांचे सेवन करू शकते आणि जितक्या उशिरा सेवन कराल तितके चांगले आहे. तसेच एखादी व्यक्ती मासे, तोफू व नट्स यासारखे लीन प्रोटीन्स सेवन करू शकते. हे खाद्यपदार्थ ऊर्जा देतात. शेवटचे म्हणजे झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध किंवा फळाचे सेवन केल्यास पहाटेपर्यंत रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

नियमित व्यायाम

नियमितपणे व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा, पण उपवासादरम्यान व्यायामाचे प्रमाण कमी ठेवा. व्यायाम अत्यंत प्रखर असेल तर चालणे किंवा योगा यासारखे सौम्य व्यायाम करता येऊ शकतात. रमजानदरम्यान कॅलरी कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे व्यायाम कमी केल्याने स्नायूंचे नुकसान होण्याला प्रतिबंध होण्यास मदत होऊ शकते.

झोपण्याच्या पद्धती

पुरेशी झोप मिळणे महत्वाचे आहे. पुरेशी झोप मिळाली नाही तर भूकेच्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे उपाशी पोटी उच्च कॅलरी संपन्न खाद्यपदार्थ खाण्याबर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. चयापचय क्रियेसाठी झोप अत्यंत महत्त्वाची आहे. ही किया रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते, जे मधूमेहावर नियंत्रणासाठी आवश्यक आहे.

हे देखील अत्यंत महत्वाचे

मधुमेहाने पीडित व्यक्तींनी रमजानदरम्यान उपवास करणे हे ऐच्छिक असले तरी एखाद्या व्यक्तीने उपवास केला तर सुरक्षितपणे व उत्तमपणे सणाचा आनंद घेण्यासाठी अगोदरच स्वत:हून नियोजन करणे आवश्यक आहे. रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी झाले तर योग्य उपचारासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या : 

Ramzan 2022 : गरोदरपणात रोजा ठेवत आहात?, मग या गोष्टी लक्षात ठेवा!

Health care : रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हे आहेत सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या याबद्दल सविस्तर! 

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.