Health Benefits : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ प्या लसणाचे पाणी !

लसूण खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लसूण खाण्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:52 AM, 5 May 2021
Health Benefits : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ प्या लसणाचे पाणी !
लसूण पाणी

मुंबई : लसूण खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लसूण खाण्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरले जाते. लसूणमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा आहेत. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपण लसूणचे पाणी घेतले तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (It is beneficial to drink garlic water to boost the immune system)

सध्याच्या कोरोना काळात तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास लसूण पाणी घेतले पाहिजे. हे केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. त्यासाठी सहा ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या. सुरूवातीला पाणी मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवा त्यानंतर त्यामध्ये लसूण घ्याला. काही वेळ हे पाणी उकळूद्या आणि प्या.

लसणाच्या रसात मध आणि लिंबू मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 10 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने आपल्याला काही दिवसात फरक दिसून येईल. जर आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु रक्तदाब कमी असल्यास लसूणचे सेवन केल्याने आपली समस्या वाढू शकते. वास्तविक, लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी उत्तम कार्य करतो.

लसणाच्या सेवनामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते. ज्या लोकांना उच्च रक्तदाब समस्या आहे. त्यांच्यासाठी खूप लसूण खूप फायदेशीर आहे. रोगाच्या दरम्यान, स्मरणशक्ती कमी होऊ लागते. हा रोग बहुतेक वेळेस म्हातारपणात होतो. लसूणमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हा रोग रोखण्यास ते मदत करतात. म्हणून, लसणाच्या सेवनाने हा रोग रोखू शकतो. लसूणमध्ये अँटी-कर्करोग घटक असतात. ते कर्करोगापासून संरक्षण करण्यात मदत करतात.

संबंधित बातम्या : 

(It is beneficial to drink garlic water to boost the immune system)