Health Tips : पीरियड्समध्ये दही खाणे फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत !

| Updated on: Jun 24, 2021 | 11:56 AM

मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. मासिक पाळी दरम्यान महिलांना पोटदुखी, चिडचिडेपणा, डोकेदुखी इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते.

Health Tips : पीरियड्समध्ये दही खाणे फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत !
मासिक पाळीच्या वेदना
Follow us on

मुंबई : मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. मासिक पाळी दरम्यान महिलांना पोटदुखी, चिडचिडेपणा, डोकेदुखी इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांना पीरियड्स दरम्यान सामान्य वेदना या होतातच. परंतु, काही स्त्रियांना या दरम्यान तीव्र वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी महिला वेगवेगळ्या गोळ्या खातात. मात्र, पीरियड्सदरम्यान गोळ्या खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. (It is beneficial to eat Curd in periods time)

पीरियडमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल नेहमीच संभ्रम असतो. विशेषतः जर आपण जुन्या श्रद्धांचे अनुसरण करीत असाल तर, पीरियड्स दरम्यान काही गोष्टी खाणे आणि स्पर्श करण्यास मनाई होते. लोकांना वाटते की, आंबट गोष्टी मासिक पाळीच्या वेदना वाढविण्याचे काम करतात. विशेष म्हणजे पीरियडमध्ये दही खाल्ल्याने अधिक त्रास होतो असा अनेकांचा समज आहे. मात्र, पीरियड्समधील त्रास कमी करण्यासाठी दही हे अत्यंत फायदेशीर आहे.

दह्यामुळे पीरियड्समधील त्रास कमी होतो. यामुळे तज्ज्ञ पीरियड्समध्ये दही खाण्याचा सल्ला देतात. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. पीरियड्स दरम्यान ताजे दही सेवन केल्याने स्नायूंचा त्रास आणि पेटके कमी होण्यास मदत होते. दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे. दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते.

दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. दही एनर्जी बूस्टर देखील आहे. त्यामुळे ताण-तणाव देखील कमी होतो. दही उत्तम अँटीऑक्सिडेंट असून, शरीर हायड्रेट देखील ठेवते. केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे. पीरियड्स दरम्यान दही खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ताक आणि लस्सी हे शरीर हायड्रेट ठेवण्याचे देखील काम करते.

संबंधित बातम्या : 

कोरोना काळात कामी येतील ‘या’ आयुर्वेदिक टिप्स, वाचा याचे महत्त्वपूर्ण फायदे…

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(It is beneficial to eat Curd in periods time)