AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रव्यापासून बनवा टेस्टी आणि हेल्दी नाश्त्याचे पदार्थ, प्रत्येक घास असेल पोषक तत्वांनी परिपूर्ण

रव्यापासून बनवलेले पदार्थ केवळ चविष्टच नाहीत, तर मुलांसाठी आरोग्यदायीसुद्धा आहेत. हे पदार्थ घरी सहजपणे बनवता येतात. चला तर मग रव्यापासून बनवलेल्या काही चविष्ट पदार्थांची रेसिपी जाणून घेऊया, जे मुलांना खूप आवडतील.

रव्यापासून बनवा टेस्टी आणि हेल्दी नाश्त्याचे पदार्थ, प्रत्येक घास असेल पोषक तत्वांनी परिपूर्ण
रव्यापासून बनवा टेस्टी आणि हेल्दी नाश्त्याचे पदार्थ, प्रत्येक घास असेल पोषक तत्वांनी परिपूर्णImage Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Aug 04, 2026 | 9:34 PM
Share

मुलांसाठी रोज रोज नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडत असतो. कारण मुलं सारखं तेच नाश्त्याचे पदार्थ खाण्यास कंटाळा करतात आणि ते पॅकेज केलेल्या स्नॅक्सकडे अधिक आकर्षित होतात. अशा परिस्थितीत घरी बनवलेले आरोग्यदायी पदार्थ हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर नाश्त्यात बनवलेले पदार्थ पौष्टिक आणि चविष्ट दोन्ही असतील तर मुलं ते आनंदाने खातील. रव्यापासून बनवलेले काही नाश्त्याचे पदार्थ हे चव आणि पोषण यांचा एक उत्तम मिलाफ ठरू शकतात.

रव्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्वे यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात, जी मुलांना ऊर्जा देण्यास मदत करतात. त्यात आपल्या आवडीच्या भाज्यांचा देखील समावेश करू शकतो, ज्यामुळे हा नाश्ता आणखी पौष्टिक बनतो. तर आजच्या लेखात आपण मुलांसाठी रव्यापासून बनवता येणारे काही टेस्टी पदार्थांची रेसिपी जाणून घेऊयात.

रव्यापासून मुलांसाठी हे 4 चविष्ट पदार्थ बनवा

रवा व्हेज उत्तपम

एका भांड्यात रवा, दही आणि थोडे पाणी एकत्र करून मिश्रण तयार करा. थोडावेळ हे मिश्रण झाकून ठेवा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेले गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदे आणि कोथिंबीर टाका. आता तव्याला थोडे तेल लावून तयार मिश्रण टाका आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. हे केवळ चविष्टच नाही, तर भाज्यांचे पोषणमूल्यही देते.

रवा व्हेज चीला

आता एका भांड्यात रवा, दही आणि पाणी एकत्र करून थोडा वेळ मुरू द्या. नंतर त्यात किसलेले गाजर, पालक, शिमला मिरची आणि सौम्य मसाले मिक्स करा. हे मिश्रण पॅनकेकप्रमाणे तव्यावर पसरवून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. दही किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. हा एक हलका आणि पौष्टिक नाश्ता आहे.

रवा पिझ्झा बाईट्स

रवा, दही आणि थोडे पाणी एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करा. त्यात मीठ आणि थोडा बेकिंग सोडा टाका. आणि थोडावेळ झाकून ठेवा. काही वेळाने तव्यावर एक गोल आकाराचा साचा ठेवा आणि त्यात हे मिश्रण टाका आणि त्यावर शिमला मिरची, टोमॅटो, मका आणि थोडे चीज टाका. आता यावर झाकण देऊन मंद आचेवर शिजवा. काही मिनिटांतच रवा पिझ्झा बाईट्स खाण्यास तयार आहे.

रवा व्हेज इडली

रवा दह्यामध्ये मिक्स करा आणि थोडा वेळ मुरू द्या. नंतर त्यात किसलेले गाजर, वाटाणे, कोथिंबीर आणि थोडे इनो किंवा बेकिंग सोडा टाका. आता हे मिश्रण इडलीच्या साच्यात ओता आणि वाफवून घ्या. मऊ, हलक्या आणि पौष्टिक इडल्या मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहेत.

रव्याचे पदार्थ बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

रव्याचे पदार्थ बनवताना ताज्या आणि स्वच्छ भाज्या वापरा. ​​पदार्थ आरोग्यदायी ठेवण्यासाठी त्यात जास्त तेल, लोणी किंवा चीज मिक्स करू नका. तुमच्या मुलाच्या वयाला योग्य असे सौम्य मसाले वापरा. ​​जर तुमच्या मुलाला विशिष्ट गोष्टींची ॲलर्जी असेल, तर ती गोष्ट पदार्थ बनवताना त्यात मिक्स करू नका.

गव्हाच्या किंवा मल्टीग्रेन ब्रेडप्रमाणेच मिश्रणात रवा टाकून त्यात गाजर, पालक, शिमला मिरची, वाटाणे आणि चीज यांसारखे घटक टाकल्याने नाश्ता अधिक पौष्टिक बनू शकतो. चव आणि पोषणमूल्ये दोन्ही टिकवून ठेवण्यासाठी आपल्या मुलांना फ्रेश तयार केलेले नाश्ता खायला द्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?