Malvani Kombdi Vade : रविवारच्या जेवणात आणा कोकणचा ठसका! झणझणीत मालवणी कोंबडी- वडे, बनवा सोप्या पद्धतीत घरच्या – घरी

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील मालवणी खाद्य संस्कृती म्हटलं तर डोळ्यांसमोर येतो. झणझणीत चिकन रस्सा आणि सोबत गरमागरम वडे. हॉटेलमध्ये जाऊन ही मेजवानी खाण्यापेक्षा घरच्या घरी अस्सल सोप्या पद्धतीने बनवा मालवणी कोंबडी वडे

| Updated on: Nov 19, 2026 | 9:36 PM
1 / 9
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील मालवणी खाद्य संस्कृती म्हटलं तर डोळ्यांसमोर येतो. झणझणीत चिकन रस्सा आणि सोबत गरमागरम वडे. हॉटेलमध्ये जाऊन ही मेजवानी खाण्यापेक्षा घरच्या घरी अस्सल मालवणी पद्धतीने मालवणी कोंबडी वडे बनवले तर जेवणाची मजाच काही औरच असते. नारळाचा खमंग स्वाद मालवणी मसाल्याचा तिखटपणा झणझणीतपणा आणि चिकनमध्ये मुरलेली चव यामुळे ही डिश नॉनव्हेज प्रेमींची आवडती ठरते. चला तर मग जाणून घेऊया मालवणी  कोंबडी वडे बनवण्याची सोपी रेसिपी

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील मालवणी खाद्य संस्कृती म्हटलं तर डोळ्यांसमोर येतो. झणझणीत चिकन रस्सा आणि सोबत गरमागरम वडे. हॉटेलमध्ये जाऊन ही मेजवानी खाण्यापेक्षा घरच्या घरी अस्सल मालवणी पद्धतीने मालवणी कोंबडी वडे बनवले तर जेवणाची मजाच काही औरच असते. नारळाचा खमंग स्वाद मालवणी मसाल्याचा तिखटपणा झणझणीतपणा आणि चिकनमध्ये मुरलेली चव यामुळे ही डिश नॉनव्हेज प्रेमींची आवडती ठरते. चला तर मग जाणून घेऊया मालवणी कोंबडी वडे बनवण्याची सोपी रेसिपी

2 / 9

मालवणी कोंबडी वडे बनवण्यासाठी साहित्य : 500 ग्रॅम चिकन, 2 कांदे, 1 टोमॅटो, 1 वाटी किसलेला सुका नारळ, 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, तेल

3 / 9

चिकन रस्सा बनवण्याची कृती :सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट लावून साधारण 20 मिनिटे मुरत ठेवा. आता एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, किसलेला नारळ भाजून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर त्याची बारीक वाटण तयार करा.

4 / 9

दुसऱ्या भांड्यात तेल गरम करून त्यात उरलेला चिरलेला कांदा परतून घ्या. त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. आता मालवणी मसाला घालून व्यवस्थित घालून त्यानंतर मुरवलेले चिकन घालून मसाला सोबत चांगले परतून घ्या.

5 / 9

चिकनला थोडा रंग आल्यावर तयार केलेलं वाटण घाला. आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून झाकण ठेवून चिकन पूर्ण शिजू द्या. चिकन शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घाला आणि अशा प्रकारे तयार होईल खवंग झणझणीत मालवणी चिकन रस्सा

6 / 9

मालवणी वडे बनवण्यासाठी साहित्य : 1 वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी उडीद डाळीचं पीठ. अर्धी वाटी बेसन, 2 चमचे ज्वारीचे पीठ, 1 चमचा धने, जिरेपूड, हळद आणि तिखट मीठ चवीनुसार तेल

7 / 9

वडे बनवण्याची कृती :एका मोठ्या भांड्यात तांदळाचे पीठ उडीद डाळीचे पीठ बेसन आणि ज्वारीचे पीठ एकत्र करा. त्यात धणे, जिरे पूड, हळद , तिखट आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. आता थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या.. पिठावरती होल पाडून त्याला थोडा वेळ मुरु द्या .

8 / 9

या पिठाचे छोटे गोळे तयार करून हाताने किंवा केळीच्या पानावर गोलाकार वडे थापून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या

9 / 9

झाले गरमागरम मालवणी चिकन रस्सा कुरकुरीत वडे कांद्याचे चकत्या आणि लिंबाची फोड असावे तयार करा रविवारच्या सुट्टीला किंवा घरातील खास पाहुणे आमची ही मालवणी मेजवानी नक्कीच करून पहा

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us