
भारतात आपण नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो. नाश्त्याबद्दल बोलायचे झाले तर, पोहे आणि उपमा जवळजवळ प्रत्येकाच्या घरात बनवले जातात. कारण हे पदार्थ बनवायला जितके सोपे आहे तितकेच त्याचे फायदेही आहेत. पोहे आणि उपमा खाल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळे आपण इतर पदार्थ खात नाही. पण जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा लोकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो की या दोन पर्यायांपैकी कोणता
पर्याय अधिक फायदेशीर ठरेल? वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये तज्ञ असे पदार्थ समाविष्ट करण्याचा सल्ला देतात की ज्यात खूप कमी कॅलरीज असावेत. तसेच फायबरचे प्रमाण जास्त असावेत आणि पोषक तत्वे भरपूर असलेले पदार्थांचे सेवन करावे. अशा परिस्थितीत पोहे आणि उपमामध्ये किती कॅलरीज असतात, कोणते पदार्थ कधी खावा आणि त्यातील घटक शरीरावर कसा परिणाम करतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पोहे खावे की उपमा खावा हे सांगणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात…
पोहे हा एक आरोग्यदायी नाश्ता आहे. तुमच्या आहारात त्याचा समावेश केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. पोहे हे फायबरने समृद्ध असल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहील. यामुळे तुम्हाला भूकही कमी लागेल. यामुळे वजन कमी करणे सोपे होते. तसेच पोह्याच्या सेवनाने तुम्हाला बराच काळ ऊर्जावान ठेवते. यामुळे तुमचे पचन सुधारतेच, शिवाय तुमचे चयापचय देखील गतिमान होते. फॅट जलद बर्न होण्यासही मदत होते. जर तुम्ही पोहे तुमच्या आहारात समाविष्ट केले तर तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर उपमा हा एक आरोग्यदायी पर्याय असू शकतो. त्यात फायबरचे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते. तुम्हाला भूकही कमी लागते. तसेच उपम्याच्या सेवनाने तुमचे पचन देखील सुधारते . तर हा उपमा बनवताना भरपूर भाज्यांचा वापर केला जातो. यामुळे तुमच्या शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते. वजन कमी करण्यासाठी कोणते जास्त फायदेशीर आहे?
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर पोहा हा एक उत्तम पर्याय असू शकतो. खरं तर पोह्यातील कॅलरीजचे प्रमाण उपमापेक्षा खूपच कमी असते. यामुळे वजन वाढण्यापासून रोखता येते. तसेच पोहे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील प्रथिनांची कमतरता देखील पूर्ण होऊ शकते.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)