AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे महापालिकेचा धक्कादायक निर्णय, थेट प्रशासनाकडून..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आजही कोणाला विश्वास होत नाही की, अजित पवार हे आपल्यात नाहीत. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे महापालिकेचा धक्कादायक निर्णय, थेट प्रशासनाकडून..
Pune Municipal Corporation and ajit pawar
| Updated on: Feb 06, 2026 | 7:54 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात कोणीही जिवंत वाचू शकले नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी सुरू आहे. अजित पवार यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. यादरम्यान या विमान अपघाताची काही व्हिडीओ देखील पुढे आली. विमान धावपट्टीच्या अगदी जवळ असताना पूर्णपणे कोलमडले. मुंबईहून सकाळी 8.15 ला अजित पवार बारामतीकडून निघाले होते. 8.45 ला त्यांच्या विमानाचा अपघात झाला. त्यापूर्वी त्यांच्या मोबाईलला नेटवर्क आले असता अपघाताच्या काही सेकंद अगोदर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये जात होते. त्यांच्या तब्बल 4 सभा होत्या. अजित पवारांच्या अपघाती निधनाने संपूर्ण पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची साथ सोडून काका अजित पवार यांच्यासोबत निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजित पवारांसह शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसला. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अजित पवार पुण्यातच होते. पण महत्वाची बैठक असल्याने ते मुंबईत आले होते. अजित पवार यांच्यासोबत त्यादिवशी महादेव जानकर देखील बारामतीला जाणार होते पण त्यांना उशीर झाल्याने ते जाऊ शकले नाहीत.

अजित पवार यांचे निधन 28 जानेवारी 2026 रोजी झाले. अजित पवार यांना जाणून काही दिवस होत नाहीत तोवरच पुणे महापालिका प्रशासनाने धक्कादायक निर्णय घेतला. अजित पवार यांच्या पक्षाने पुण्यात मोठी विकासकामे केली. मात्र, अजित पवार यांच्या निधनाचा पुणे महापालिका प्रशासनाला विसर पडल्याचे बघायला मिळत आहे.

अजित पवार यांच्या निधनाला अद्याप दहा दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेने एक अजब निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नाच-गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 तारखेला महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शोककाळ सुरू असताना अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन पुणे महापालिका प्रशासनाने केल्याने मोठी खळबळ उडालीये.

Follow Us
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद