Health care : रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हे आहेत सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या याबद्दल सविस्तर! 

रक्तातील साखर (Blood sugar) असलेल्या रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. काही लोकांसाठी रक्तातील साखरेची पातळी वाढणे अनुवांशिक आहे, परंतु टाइप 2 मधुमेह (Type 2 diabetes) असलेल्यांसाठी आपली जीवनशैली कारणीभूत आहे. जास्त ताण, व्यायाम न करणे आणि फास्ट फूडचे अतिसेवन या सर्व कारणांमुळे वजन वाढते.

Health care : रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हे आहेत सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या याबद्दल सविस्तर! 
दररोजच्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी राहा.
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 1:05 PM

मुंबई : रक्तातील साखर (Blood sugar) असलेल्या रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. काही लोकांसाठी रक्तातील साखरेची पातळी वाढणे अनुवांशिक आहे, परंतु टाइप 2 मधुमेह (Type 2 diabetes) असलेल्यांसाठी आपली जीवनशैली कारणीभूत आहे. जास्त ताण, व्यायाम न करणे आणि फास्ट फूडचे अतिसेवन या सर्व कारणांमुळे वजन वाढते. वजन वाढल्याने मधुमेहासारख्या समस्या उद्भवतात. साखर, मैदा, तांदूळ किंवा कार्बोहायड्रेट्सचे (Carbohydrates) प्रमाण पूर्णपणे कमी केले पाहिजे. फायबर व्यतिरिक्त प्रथिने अधिक खाणे आवश्यक आहे.

प्रोटीनयुक्त नाश्ता अत्यंत महत्वाचा

निरोगी राहण्याचा एकच मंत्र आहे, तो म्हणजे आपले वजन संतुलित ठेवणे. त्याचबरोबर दैनंदिन खाण्यापिण्यातही बदल करणे आवश्यक आहे. म्हणूनच पोषणतज्ञ म्हणतात की दररोज सकाळी प्रोटीनयुक्त नाश्ता करायला हवा. हे रक्तातील साखर नियंत्रित करते आणि अधिक फायबर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी एका विशिष्ट मर्यादेत ठेवण्यास मदत होते. सकाळी नाश्त्यामध्ये दही, शेंगदाणे, लोणी, दूध किंवा अंडी यांचा समावेश करा. याशिवाय दैनंदिन आहारात उच्च फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

भाज्या खाल्ल्याने साखरेची पातळी कमी राहते

तुम्ही भाज्यांसोबत ओट्स किंवा दलिया बनवू शकता. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की नाश्त्यामध्ये जास्त फायबर आणि भाज्या खाल्ल्याने साखरेची पातळी कमी होते. आणि अशा प्रकारचे अन्न दीर्घकाळ पोट भरलेले राहते. तसेच शरीराला हायड्रेट ठेवते. तसेच  नाश्त्यानंतर कोणतेही हंगामी फळ खा. तुमच्या आवडत्या भाज्या, ओट्स, दही आणि अंड्याचा पांढरा भाग असलेले ऑम्लेट खाणे देखील फायदेशीर आहे.  हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Health Care : उन्हाळ्यात या गोष्टींचा आहारात समावेश करा आणि वजन कमी करा! 

Health Tips : उन्हाळ्याच्या हंगामात शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!