काश्मीरमध्ये कोणत्या प्राण्याचे मांस सर्वात जास्त खाल्ले जाते? 30 पेक्षा जास्त पदार्थांमध्ये होतो वापर

Kashmir Food Culture: काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो. पारंपारिक पदार्थांमध्ये मांस मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आज आपण या प्रदेशात सर्वात जास्त कोणत्या प्राण्याचे मांस खाल्ले जाते ते सविस्तर जाणून घेऊयात.

काश्मीरमध्ये कोणत्या प्राण्याचे मांस सर्वात जास्त खाल्ले जाते? 30 पेक्षा जास्त पदार्थांमध्ये होतो वापर
Mutton Curry
| Updated on: Nov 16, 2025 | 5:21 PM

भारताच्या उत्तरेकडील काश्मीर हा प्रदेश पर्यटनासाठी आपल्या खाद्यसंस्कृतीसाठी ओळखला जातो. काश्मिरमधील बहुतांशी लोक हे मुस्लिम धर्माचे आहेत. त्यामुळे काश्मीरमधे मांसाहार मोठ्या प्रमाणात केला जातो. काश्मीरमध्ये मटण हे सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे अन्न आहे. पारंपारिक पदार्थांमध्ये मटणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लग्नात मटनापासून विविध पारंपारिक पदार्थ बनवले जातात. ऋग्वेदातही या प्रदेशातील मांसाहारी परंपरेचा उल्लेख आहे. काश्मीरमध्ये कोणत्या प्राण्याचे मटण खाल्ले जाते ते जाणून घेऊयात.

काश्मीरमध्ये सर्वात जास्त कोणत्या प्राण्याचे मांस खाल्ले जाते?

मटण हा शब्द फ्रेंच शब्द माउटन पासून आला आहे, याचा अर्थ मेंढी असा आह. काश्मीरमध्ये मेंढी आणि बोकडाचे मटण मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. या भागातील जवळजवळ प्रत्येक प्रमुख पारंपारित पदार्थात मटण वापरले जाते. रोजच्या आहारासह विशेष प्रसंगी आणि सणांच्या दिवशीही खाल्ले जाते. त्याचबरोबर काही लोक चिकन आणि बीफ देखील खातात, मात्र मटण सर्वात लोकप्रिय आहे.

काश्मीरमधील लोकप्रिय पदार्थ

काश्मीरमधील रोगनगोश, याखनी, गोश्ताबा आणि रिस्ता हे लोकप्रिय पदार्थ आहेत. हे पदार्थ काश्मीरी मसाल्यांचा वापर करून बनवले जातात, ज्यामुळे त्यांची चव आणखी वाढते. मटण हा केवळ एक पदार्थ नसून तो काश्मीरच्या खाद्यसंस्कृतीतील परंपरेचा भाग आहे. प्रसिद्ध वाझवान थाळीत जवळपास सर्वच पदार्थांमध्ये मटणाचा वापर केला जाचतो. लग्न, सण किंवा इतर मोठ्या कार्यक्रमांमध्ये मटणाचे पदार्थ बनवले जातात.

थंड हवामानामुळे मटण लोकप्रिय

काश्मीरमध्ये थंड हवामान असते. त्यामुळे या प्रदेशात मटण खूप लोकप्रिय आहे. कारण मटणाचे सेवन केल्यामुळे शरीर उबदार राहते तसेच शरीराला ऊर्जा देते. याच कारणामुळे ते लोकप्रिय झाले आहे. याचाच अर्थ काश्मीरमधील खाद्यसंस्कृती ही पूर्णपणे मटणावर आधारित आहे. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगराळ प्रदेश आहे, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात शेळीपालन आणि मेंढीपालन केले जाते. याच शेळ्यांचे आणि मेंढ्यांचे मटण बाजारात विकले जाते. तसेच बरेच लोक हे आपल्या घरी शेळीपालन आणि मेंढीपालन करतात आणि त्यांचे मांस खाण्यासाठी वापरतात.