Calcium Side Effects | आवश्यकतेपेक्षा जास्त कॅल्शियमचे सेवन ठरेल आरोग्यासाठी नुकसानदायी! जाणून घ्या याविषयी…

आपल्या शरीरातील 70 टक्के हाडे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेली असतात. हेच कारण आहे की, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Calcium Side Effects | आवश्यकतेपेक्षा जास्त कॅल्शियमचे सेवन ठरेल आरोग्यासाठी नुकसानदायी! जाणून घ्या याविषयी...
या पदार्थांचे सेवन करा, कॅल्शिअमची कमी होईल दूर, हाडे होतील मजबूत

मुंबई : आपल्या शरीरातील 70 टक्के हाडे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेली असतात. हेच कारण आहे की, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बर्‍याच वेळा शरीरात कॅल्शियमची कमतरता भागण्यासाठी लोक कॅल्शियम पूरक आहार घेण्यास सुरुवात करतात (Know about Calcium Side Effects).

जर, एखाद्या तज्ज्ञाने आपल्याला आपली शारीरिक स्थिती तपासून हा कॅल्शियम पूरक आहार घेण्यास सांगितले असेल, तर ते ठीक आहे. परंतु, आपण हा आहार आपली शरीराला कॅल्शियम देईल, या विचाराने ते घेत असाल तर, मात्र ते योग्य नाही. कारण ज्याप्रकारे कॅल्शियमची कमतरता शरीराला हानी पोहचवते, त्याच प्रकारे कॅल्शियमची अधिक मात्रा देखील आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.

प्रत्येकासाठी किती कॅल्शियम आवश्यक आहे ते जाणून घ्या…

सर्वसाधारणपणे पुरुषांनी दररोज किमान 1000 ते 1200 मिलीग्राम कॅल्शियम घ्यावे, महिला आणि वृद्धांनी दररोज 1200 ते 1500 मिलीग्राम आणि मुले कमीतकमी 1300 आणि 2500 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅल्शियम घ्यावीत. परंतु, जर आपण कॅल्शियम सप्लीमेंट्स व्यतिरिक्त दररोज अन्नाद्वारे देखील कॅल्शियम घेत असाल तर, ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

जास्त प्रमाणात कॅल्शियममुळे होते ‘हे’ नुकसान!

वास्तविक, जेव्हा शरीरात कॅल्शियम जास्त प्रमाणात जमा होते, तेव्हा मूत्रपिंड हे सहजपणे फिल्टर करू शकत नाही. अशावेळी त्या व्यक्तीला मुतखड्याचा त्रास होऊ शकतो. या व्यतिरिक्त, जास्त कॅल्शियम सेवन केल्यामुळे, हाडांमध्ये ताठरता, तसेच बीपीवर देखील परिणाम होतो. यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि लवकर ब्रेक होण्याची समस्या उद्भवू शकते. कधीकधी जास्तीचे कॅल्शियम मेंदूच्या नुकसानासदेखील जबाबदार असू शकते ((Know about Calcium Side Effects).

सप्लीमेंट नव्हे, कॅल्शियमयुक्त आहार घ्या!

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने कॅल्शियम सप्लीमेंट पूरक आहार घेऊ नका. त्याऐवजी कॅल्शियम समृद्ध आहार सेवन करा. यासाठी दररोज किमान दोन ग्लास दूध प्या. त्याशिवाय दही, ताक, चीज इत्यादी डेअरी उत्पादनांचे नियमित सेवन करा. कॅल्शियम आहाराबरोबरच, थोडा वेळ उन्हात बसण्याची सवय लावा. जेणेकरून सूर्यापासून मिळणारे जीवनसत्व डी कॅल्शियम शरीरात शोषले जाईल.

अधिक कॅल्शियम आणखी काही दुष्परिणाम

कॅल्शियमच्या अति प्रमाणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात, त्यामुळे त्याचा ओव्हरडोस न घेण्याचा सल्ला दिला जातो. स्नायू दुखणे हा शरीरात कॅल्शियमचे प्रमाण अधिक झाल्याचे लक्षण आहे. तसेच त्यामुळे तोंड कोरडे पडणे, अशक्तपणा, थकवा यांना सामोरे जावे लागते. काही लोकांना खूप काळ डोकेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. बद्धकोष्ठता होण्यास देखील कॅल्शियम  कारणीभूत ठरते.

(Know about Calcium Side Effects)

हेही वाचा :

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

Food Tips | आयुर्वेद सांगतंय मधासोबत ‘या’ गोष्टी खाऊ नका एकत्र, अन्यथा आरोग्याला होऊ शकते हानी!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI