पूजा-पाठ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, घरात नांदेल सुख-समृद्धी!

| Updated on: Feb 25, 2021 | 11:28 AM

आपण सर्वचजण आपापल्या दिवसाची सुरुवात पूजा आणि उपासनेनंतरच करतो. सनातन धर्मात आंघोळ केल्यावर देवासमोर नतमस्तक होणे बंधनकारक आहे.

पूजा-पाठ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, घरात नांदेल सुख-समृद्धी!
पूजा पाठ
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात पूजा पाठांना विशेष महत्त्व आहे. आपण सर्वचजण आपापल्या दिवसाची सुरुवात पूजा आणि उपासनेनंतरच करतो. सनातन धर्मात आंघोळ केल्यावर देवासमोर नतमस्तक होणे बंधनकारक आहे. पूजा पाठ करणे जितके आवश्यक आहे, तितकेच त्यांच्या नियमांचे पालन करणे देखील महत्वाचे मानले जाते. चला तर, आज जाणून घेऊया उपासनेच्या अशाच काही महत्त्वपूर्ण नियमांबद्दल…(Know about pooja rules and rituals)

पूजा-पाठ करताना ‘या’ गोष्टी लक्षात घ्या!

– एका हाताने कधीही देवापुढे नमन करु नका. यासह पूजा झाल्यानंतर घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. तर, झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला कधीही स्पर्श करु नका.

– पूजेच्या वेळी जप करण्याचा मंत्र योग्य असावा. जप करताना जीभ हलवू नये. जप करताना उजव्या हाताला कपड्याने झाकून जप केला पाहिजे. यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

– कधीही संध्याकाळच्या वेळी तुळशीचे पान तोडू नये. खासकरुन संक्रांत, द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा आणि रविवारी तुळशीच्या रोपाला स्पर्श देखील करु नये.

– कधीही एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. याशिवाय यज्ञ आणि श्राद्धात काळे तीळ वापरावे.

– शनिवारी शनि दोष कमी करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे. तसेच पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालावी (Know about pooja rules and rituals).

– महिलां भोपळा, नारळ आणि कलिंगड तोडू नये किंवा ते चाकूने देखील कापू देखील नये. चुकूनही देवाच्या नैवाद्याला ओलांडून जाऊ नये.

– एकादशीच्या दिवशी, अमावस्या, पौर्णिमा आणि श्राद्ध या दिवशी दाढी कापू नये. पूजा करण्यापूर्वी तुम्ही जेनेऊ घातलेच पाहिजे. जेनेऊ परिधान न करता उपासना केल्यास कोणतेही फळ मिळत नाही.

– भगवान शंकराला कुंडाचे फुल, विष्णूला धतुरा, देवीला शेवरी आणि सूर्यदेवाला तगरीचे फुल कधीही अर्पण करू नये.

– पूजेच्या वेळी आपल्या डाव्या बाजूला तूपांचा दिवा लावा आणि देव-देवतांना उजव्या बाजूला ठेवा. तसेच, तांदळाच्या राशीवर दिवा लावावा.

– असे मानले जाते की, कमळांचे फूल 5 रात्र ताजे राहते. त्याचप्रमाणे तुळशीची पाने देखील 10 रात्रींपर्यंत शिळी होत नाहीत.

– पूजा करताना आपला चेहरा पूर्वेकडे ठेवावा. पाणी, शंख आणि पूजा सामग्री आपल्या उजव्या बाजूला ठेवा. त्याच वेळी, घंटी आणि धूप डाव्या बाजूला ठेवावा.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Know about pooja rules and rituals)

हेही वाचा :

Magh Purnima 2021 | माघ पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, घरात भासणार नाही आर्थिक चणचण!

Pradosh Vrat | आनंद, सौभाग्य आणि समृद्धी देणारा बुध प्रदोष, जाणून घ्या ‘या’ व्रताची कथा…