Travel | ‘ठाणे’ केवळ महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही! वाचा परदेशात असलेल्या ‘या’ भारतीय शहरांबद्दल…

| Updated on: Mar 29, 2021 | 8:00 AM

भारतातील सर्व शहरे तेथील अद्वितीय गोष्टींसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. परंतु, आपणास माहित आहे का की, देशात अशी काही शहरे आहेत ज्यांची नावे इतर देशांच्या शहरांशी अगदी मिळती-जुळती आहेत.

Travel | ‘ठाणे’ केवळ महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही! वाचा परदेशात असलेल्या ‘या’ भारतीय शहरांबद्दल...
बाली
Follow us on

मुंबई : भारतातील सर्व शहरे तेथील अद्वितीय गोष्टींसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. परंतु, आपणास माहित आहे का की, देशात अशी काही शहरे आहेत ज्यांची नावे इतर देशांच्या शहरांशी अगदी मिळती-जुळती आहेत. जर, आपल्यालाही फिरण्याचा छंद असेल, तर आपल्याला त्याबद्दल माहित असणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात आपण या ठिकाणांना भेट देऊ शकाल आणि तेथील सर्व मनोरंजक गोष्टी जाणून घेऊ शकाल… चला तर, जाणून घेऊया या शहरांबद्दल…(know about Some Indian Cities name matched with foreign cities)

कोची – केरळ आणि जपान

भारताच्या केरळ राज्यातील ‘कोची’ हा लक्षद्वीप समुद्राच्या नैऋत्य किनारपट्टीवर एरानाकुलम जिल्ह्याचा एक भाग असलेल्या दक्षिण बंदरात वसलेले एक मोठे बंदर शहर आहे. कोचीला ‘अरबी समुद्राची राणी’ म्हणून देखील ओळखले जाते. त्याच वेळी, ‘कोची’ नावाचे शहर जपानमधील शिकोकू बेटावर देखील आहे, जे सी फूड्ससाठी खूप प्रसिद्ध आहे.

लखनऊ – उत्तर प्रदेश आणि अमेरिका

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ हे शहर शाही कुटुंबे आणि वाड्यांसाठी प्रसिद्ध आहे, तर अमेरिकेतही लखनऊ नावाचे ठिकाण आहे. पण, हे इथल्या नवाबांना याची माहित नाही. लखनऊला अमेरिकेत ‘ए कॅसल इन क्लाउड्स’ म्हणून देखील ओळखले जाते.

पाटणा – बिहार आणि स्कॉटलंड

बिहारच्या पाटणानंतर, स्कॉटलंडमधील एका खेड्याचे नाव पाटणा ठेवले गेले. जे या शहराच्या संस्थापकास श्रद्धांजली म्हणून देण्यात आहे. ज्यांचा जन्म पाटणा शहरात झाला होता.

हैदराबाद – तेलंगणा आणि पाकिस्तान

हैदराबाद तेलंगणा राज्याची राजधानी आहे. जे भारतातील प्रमुख शहरांपैकी एक आहे. हैदराबादचा इतिहास दोन्ही देशांमध्ये चर्चेत झाला आहे. पाकिस्तानमध्ये हैदराबादचे नाव नबी मुहम्मद यांचे चुलत भाऊ, हैदर अली यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे (know about Some Indian Cities name matched with foreign cities).

बाली – राजस्थान आणि इंडोनेशिया

बाली राजस्थानातील पाली जिल्ह्यातील एक गाव आहे. जे इंडोनेशियाच्या बाली इतके प्रसिद्ध नाही. हे एक प्रसिद्ध फिरण्याचे ठिकाण आहे, जिथे जगभरातून लोक फिरायला जातात. मात्र, या दोन्ही ठिकाणांमध्ये काहीही साम्य नाही.

ठाणे – महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया

महाराष्ट्रातील ठाणे सुंदर समुद्रकिनारा म्हणून ओळखले जाते. पण एक ठाणे शहर ऑस्ट्रेलियामध्येही आहे. मात्र, या शहराला ठाणे हे नाव कसे पडले, हे अद्याप गूढ आहे.

बडोदा – गुजरात आणि अमेरिका

गुजरात राज्यात बडोदा नावाचे एक मोठे शहर आहे, तर अमेरिकेतील बडोदा मायकेल हौसर नावाच्या व्यक्तीने तयार केले आहे. ज्याचे नाव पूर्वीचे पोमोना होते, परंतु नंतर ते बडोदा म्हणून ओळखले जाऊ लागले.

ढाका – बिहार आणि बांगलादेश

ढाका बिहार राज्याच्या पूर्व चंपारणमध्ये स्थित आहे. या भागाला ‘चंपारण सत्याग्रह’ असेही म्हणतात. त्याचबरोबर ढाका नावाचे शहर बांगलादेशची राजधानी देखील आहे.

(know about Some Indian Cities name matched with foreign cities)

हेही वाचा :

Travel | दोन-तीन हजार नाही, तर दोन-तीन लाखांच्या घरात तिकिटांच्या किंमती, वाचा ‘या’ खास ट्रेनबद्दल…

Trave | जगप्रसिद्ध चहाचे मळे पाहायला ‘आसाम’ फिरण्याची योजना आखताय? मग, वाचा ‘या’ राज्याविषयी काही खास गोष्टी…