काय…फास्ट फूडमध्ये वापरला जाणारा ओरेगॅनो आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या हे आरोग्यदायी फायदे

पिझ्झा असो किंवा इटालियन पदार्थ बहुतेक पदार्थांमध्ये ओरेगॅनोचा वापर केला जातो. त्यामुळे पदार्थांची चव वाढते. पण तुम्हाला ओरेगॅनोचे हे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का? चला तर मग आजच्या लेखात आपण ओरेगॅनो सेवन केल्याने कोणते फायदे शरीराला होतात ते जाणून घेऊयात.

काय...फास्ट फूडमध्ये वापरला जाणारा ओरेगॅनो आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या हे आरोग्यदायी फायदे
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Apr 03, 2026 | 5:49 PM

आजच्या बदलत्या जीवनशैलीत जंकफूडचे सेवन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. खाण्यापिण्याच्या मॉर्डन पद्धतीत ओरेगॅनो मसाला हा आता एक अविभाज्य भाग आहे. कारण या ओरेगॅनोचा वापर आता पिझ्झासोबतच नाहीतर गार्लिक ब्रेड, पास्ता आणि इतर पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच अनेक पदार्थमध्ये याचा वापर केल्याने त्या डिशची चव अनेक पटींनी वाढते. त्यामुळे आजकाल बाजारात ओरेगॅनो सहज विकत घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की या ओरेगॅनोचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जे फार कमी लोकांना माहित आहे. त्यासोबतच ओरेगॅनो हा तुम्ही घरीही बनवू शकता.

खरं तर, हे ओव्याची पाने आणि इतर मसाले व औषधी वनस्पतींपासून बनवले जाते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून ओरेगॅनो आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चला तर मग आजच्या लेखात ओरेगॅनोच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल जाणून घेऊयात.

ओरेगॅनो कसे बनवायचे

ओरेगॅनो मधील मुख्य घटक म्हणजे ओव्याची पाने. तुम्ही त्यात इतर औषधी वनस्पती देखील मिक्स करू शकता. यामध्ये सुकी तुळशीची पाने, लसूण पावडर, चिली फ्लेक्स, रोझमेरी आणि काळी मिरी पावडर यांचाही समावेश असतो. बऱ्याच ठिकाणी सुक्या पुदिन्याची पाने देखील यात वापरली जातात. तर घरी ओरेगॅनो बनवण्यासाठी, ओव्याची पाने, चिली फ्लेक्स आणि इतर घटक एका पॅनवर मंद आचेवर भाजून घ्या. नंतर ते हलकेच कुटून घ्या. त्यामध्ये काळे मीठ देखील मिक्स करू शकता. तुमचा घरगुती ओरेगॅनो तयार आहे.

ओरेगॅनोचे आरोग्यदायी फायदे

ओरेगॅनोचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याची त्याची क्षमता. हेल्थलाइननुसार एक चमचा ओरेगॅनोमधून तुमच्या दैनंदिन व्हिटॅमिन केच्या गरजेपैकी 5 ते 7 टक्के गरज पूर्ण होते.

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध

ओरेगॅनोमध्ये कार्व्हक्रोल आणि थायमोल सारखे अँटीऑक्सिडंट्स असलेली आवश्यक तेलं असतात. हे अँटीऑक्सिडंट्स पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. जेव्हा तुम्ही ओरेगॅनो इतर उच्च अँटीऑक्सिडंट्स असलेली फळं आणि भाज्यांसोबत खाता, तेव्हा दुप्पट आरोग्य फायदे तुम्हाला मिळतात.

जीवाणूंशी लढण्यात प्रभावी

ओरेगॅनोमध्ये अनेक संयुगे असतात ज्यात जीवाणूनाशक गुणधर्म असतात. एका अभ्यासानुसार ओरेगॅनोमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये जीवाणूनाशक क्रियाशीलता असते. त्यामुळे विविध प्रकारच्या जीवाणूंशी लढण्यासाठी किंवा त्यांच्यापासून आपले संरक्षण करण्यासाठी ओरेगॅनोचे सेवन उपयुक्त ठरते.

विषाणूजन्य संसर्गांपासून संरक्षण करणे

अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, त्यात असलेले कार्व्हेक्रोल आणि थायमोल घटक विषाणूविरोधी फायदे देतात. यामुळे तुम्हाला अतिसार, मळमळ आणि पोटदुखीमधून नैसर्गिकरित्या बरे होण्यास मदत होऊ शकते.

सूज कमी करण्यास उपयुक्त

ओरेगॅनो शरीरातील सूज कमी करण्यास काही प्रमाणात मदत करतात. मात्र दीर्घकाळ टिकणाऱ्या सूजमुळे हृदयरोग, मधुमेह आणि ऑटोइम्यून आजार होऊ शकतात. मात्र, ओरेगॅनोमधील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सना कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे सूज कमी होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us