AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुप्त रिपोर्ट पुढे, पाकिस्तान काश्मीरच्या मुद्द्यावर खालच्या पातळीला, थेट अमेरिकेचा नकार, जोरदार..

Pakistan wants US Support on Kashmir : अमेरिका आणि इराण यांच्या युद्धादरम्यान धक्कादायक माहिती पुढे आली. ज्याने खळबळ उडाली. पाकिस्तानच्या मनात भारताबद्दल किती काळे आहे आणि भारताविरोधात पाकिस्तान किती जास्त खालच्या पातळीवर जाऊ शकतो, हे पुढे आले.

गुप्त रिपोर्ट पुढे, पाकिस्तान काश्मीरच्या मुद्द्यावर खालच्या पातळीला, थेट अमेरिकेचा नकार, जोरदार..
Pakistan and US
| Updated on: May 19, 2026 | 1:22 PM
Share

गेल्या काही वर्षात पाकिस्तान आणि अमेरिकेत संबंध सुधारले आहेत. मात्र, हे फक्त वरून वरून दाखवले जाते. ज्यावेळी भारताचा मुद्दा येतो, त्यावेळी पाकिस्तान आणि अमेरिकेत मतभेद निर्माण होतात. नुकताच धक्कादायक माहिती पुढे आली. ज्याने पाकिस्तान किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, हे पुन्हा एकदा जगापुढे आले, काश्मीरच्या मुद्द्यात पाकिस्तान अमेरिकेची मदत मागण्याकरिता गेले असता अमेरिकेने थेट पाकिस्तानलाच तोंडावर पाठवले. भारताने वेळोवेळी स्पष्ट केले की, काहीही झाले तरीही काश्मीरच्या मुद्द्यात कोणत्याही देशाची लुटबुड सहन करणार नाही. काश्मीरचा मुद्दा फक्त भारत आणि पाकिस्तानमधील आहे, त्यामुळे यात कोणालाही बोलण्याचा विषयच येत नाही. यादरम्यानच आता 2022 चे गुप्त कागदपत्र पुढे आली, ज्याने मोठी खळबळ उडाली.

अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेद पुढे आलेत. पाकिस्तानची नेहमीच तक्रार आहे की, काश्मीरच्या मुद्द्यात अमेरिका त्यांचे पूर्ण समर्थन करत नाही. ड्रॉप साईट न्यूजने केलेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे प्रकरण उघडकीस आले आहे. गुप्त कागदपत्रांनुसार, काश्मीर, युक्रेन रशिया युद्ध आणि चीन या मुद्द्यात पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात मतभेद आहेत. गुप्त कागदपत्रातील माहितीनुसार, 7 मार्च 2022 रोजी पाकिस्तानचे तत्कालीन अमेरिकी राजदूत आसद मजीद खान यांनी अमेरिकी परराष्ट्र विदेश मंत्री डोनाल्ड लू यांच्यासोबत भेट घेतली.

काही तास यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानने अमेरिकेवर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. आसद मजीद खान यांनी वॉशिंग्टन पाकिस्तानच्या प्रत्येक मुद्द्यात समर्थन देतो पण काश्मीरच्या मुद्द्यात समर्थन देत नाही. युक्रेन युद्धात भारताची तटस्थता आणि रशियासोबतचे संबंध याबाबत अमेरिका खूपच सौम्य भूमिका घेत आहे, पण पाकिस्तावर दबाव आणत आहे.

असद मजीद खान यांनी डोनाल्ड लू यांना सांगितले की, अमेरिकी सिनेटच्या उपसमितीच्या सुनावणीत भारताच्या भूमिकेचा बचाव करणाऱ्या लू यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला दुटप्पीपणाचा अनुभव आला. अमेरिका भारत आणि पाकिस्तान यांच्याबाबत वेगवेगळी भूमिका घेत आहे. डोनाल्ड लू यांनी पाकिस्तानच्या या आरोपांवर म्हटले की, अमेरिका भारताकडे प्रामुख्याने चीनसोबतच्या सामरिक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून पाहते. या रिपोर्टवरून कळते की, पाकिस्तानच्या मनात भारताबद्दल किती जास्त विष आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...