AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग भ्रमंतीसाठी सोडले 3 कोटीच्या पॅकजवर पाणी, कुशा कपिलाच्या बिझनस पार्टनरने का घेतला निर्णय?

आज काल जो तो पैसे कमावयाच्या मागे लागला आहे. प्रत्येकजण याच मार्गाने जात असताना एखाद्याने जर तीन कोटी रुपयांचे पॅकेज धूडकावून जग फिरण्याचा निर्णय घेतला असेल तर याला काय म्हणावे....अशाच प्रकार घडला आहे...

जग भ्रमंतीसाठी सोडले 3 कोटीच्या पॅकजवर पाणी, कुशा कपिलाच्या बिझनस पार्टनरने का घेतला निर्णय?
Vimarsh Rajdan turned down a three-crore package to travel
| Updated on: Aug 01, 2026 | 10:24 AM
Share

आजकालच्या काळात काही लोक लाखोच्या पॅकेजसाठी आपली झोप आणि आराम कुर्बान करण्यास एका पायावर तयार असतात. मात्र, एक व्यक्ती असा आहे की त्याने तीन कोटी वार्षिक पॅकेजची ऑफर यासाठी धुडकावली की त्याला जग फिरायचे होते आणि आयुष्य मनमुराद जगायचे होते. आपण बोलत आहोत प्रसिद्ध अभिनेता आणि कंटेट क्रिएटर कुशा कपिलाचे शेपवियर ब्रँड ‘अंडरनीट’चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विमर्श राजदान यांच्याबद्दल !

विमर्श राजदान याने अलिकडे सोशल मीडिया प्लेटफॉर्म लिंक्डईनवर त्याच्या करियरचा एका असा अनुभव सादर केला आहे. जो प्रत्येकालाच विचार करण्यास प्रवृत्त करेल. त्याने सांगितले की कशा प्रकारे १३ वर्षांपर्यंत सतत कामाच्या भट्टीत जुंपून घेतल्यानंतर त्यांनी एक वर्षांचा मोठा ब्रेक घेतला आणि संपूर्ण जगाचा प्रवास केला.

१८ ते २० तासांचे काम, केवळ झोपायला घरी येणे

विमर्श राजदान याने आपल्या रंजक प्रवासाची हकीकत सांगताना लिहिले आहे की त्यांचे जीवन केवळ आणि केवळ कामाच्या भोवती फिरत होते. त्यांचे घर केवळ झोपायला जाण्याची काही तासांचे सोबती बनले होते.

त्यांनी लिहिले की १३ वर्षे सतत त्यांचे रुटीन १८ ते २० तास काम करण्याचे होते. त्यांनी कामाला अगदी वाहून घेतले होते. त्यानंतर एकेदिवशी त्याने काही बदल करण्याचा निर्णय घेतला. त्याने तीन कोटी रुपयांची भारी पॅकेज आणि मोठ्या जबाबदारीचे पद सोडून दिले. त्यावेळी त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि त्याला वेडे ठरवले. एवढी चांगली नोकरी नाकारणारा वेडाच आहे अशी त्याची संभावना केली.

परंतू विमर्श याने एक वर्षांचा ब्रेक घेतला आणि युरोपातील निरनिराळे देश उदा. आईसलँड, क्रोएशिया आणि पॅरिसची सैर केली. या प्रवासामुळे त्याचे जीवन संपूर्णपणे बदलले आणि त्याला समजले की व्यावसायिक यश आणि जीवनात संतुलन गरजेचे आहे.

निफ्ट ते IIM चा शानदार प्रवास

फॅशन, मॅनेजमेंट आणि उद्योग क्षेत्रात विमर्श याचे करियर शानदार राहिले.त्याने १९९९ ते २००१ दरम्यान नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी म्हणजेच निफ्टमधून दिल्लीतून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला. त्यानंतर २०१६ ते २०१७ दरम्यान त्याने आयआयएम कोलकाता येथून बिझनेस एडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण पूर्ण केले.

त्यांनी साल २००१ ते २०१७ पर्यंत ओरिएंट क्राफ्ट कंपनीत सुमारे १६ साल घालवले आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंटपदापर्यंत पोहचले. त्यानंतर त्यांनी पॅरिस येथील एका मोठ्या कंपनीत संचालक म्हणून काम केले. आणि २०१७ पासून एटिक साल्टचे संचालक म्हणून काम केले.

नवा ब्रँड विकसित केला

फॅशन इंडस्ट्री आणि बिझनेस ऑपरेशन्सचा दीर्घ अनुभव मिळाल्यानंतर विमर्श याने कुशा कपिला सोबत मिळून ‘अंडरनीट’ ब्रँडची सुरुवात केली. हा ब्रँड आजच्या काळात ग्राहकांच्या हिशेबाने शेपवियर आणि इनरवेअरचे उत्पादन करते. कधी कधी थांबायला देखील हवे, प्राथमिक गरजांवर पुन्हा विचार करणे आणि कामाच्या सोबत आपल्या जीवनाचे योग्य संतुलन बनवणे गरजेचे असते असा विमर्श राजदान याने त्याच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये संदेश दिला आहे.

Follow Us
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...