मास्क लावूनही लिपस्टिक खराब होणार नाही ‘या’ टिप्स फाॅलो करा

| Updated on: Apr 28, 2021 | 12:09 PM

बहुतेक स्त्रियांना मेकअप करायला फार आवडते. परंतु कोरोनाच्या काळात मास्क लावणे अनिवार्य आहे.

मास्क लावूनही लिपस्टिक खराब होणार नाही या टिप्स फाॅलो करा
मेकअप
Follow us on

मुंबई : बहुतेक स्त्रियांना मेकअप करायला फार आवडते. परंतु कोरोनाच्या काळात मास्क लावणे अनिवार्य आहे. यामुळे बहुतेक स्त्रियांचा मेकअप खराब होतो. त्यामध्येही विशेष करून मास्क लावल्यानंतर लिपस्टिक खराब होते. जर आपण देखील या समस्येमुळे त्रस्त असाल तर आम्ही आपल्याला काही टिप्स सांगत आहोत. ज्यामध्ये तुम्ही मास्क लावले तरी तुमची लिपस्टिक खराब होणार नाही. (Lipstick will not be spoiled despite applying mask follow these tips)

-आपल्या सर्वांना हे माहित आहे की कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क लावणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, आपण डार्क मेकअप करणे टाळले पाहिजे. त्याऐवजी आपण थोडा हलका मेकअप केला पाहिजे.

-आपण चेहर्‍याऐवजी डोळ्याभोवती मेकअप करावा. यामुळे आपले डोळे बोल्ड आणि सुंदर दिसतील. शक्यतो वॉटरप्रूफ मस्करा लावा. तो बऱ्याच वेळ टिकून राहिल.

-जर आपण लिपस्टिकमध्ये क्रीमी फॉर्म्युला वापरत असाल तर लिपस्टिक लावल्यानंतर आपण ट्रांसलूसेंट पावडर वापरू शकता. हे आपल्या ओठांना मॅट लुक देईल तसेच लिपस्टिक त्वरीत खराब होणार नाही.

-मास्क घालण्यापूर्वी आपला मेकअप चांगला सेट झाला पाहिजे. मेकअप स्पंजच्या मदतीने बेस व्यवस्थित लावा आणि काही काळानंतर मास्क घाला. असे केल्याने, मेकअप जास्त काळ टिकेल आणि आपली त्वचा सुंदर आणि चमकदार दिसेल.

-जर तुमचे ओठ कोरडे होत असतील तर ग्रीन टीची बॅग कोमट पाण्यात ठेवा आणि ती ओठांवर लावा. आपण दररोज काही मिनिटे हा उपाय करू शकता. हे लक्षात ठेवा की ग्रीन टीची बॅग जास्त गरम होणार नाही. नाहीतर यामुळे आपले ओठ खराब होऊ शकतात.

-जेव्हा ओठांची काळजी घेण्याचा विषय येतो. त्यावेळी आपण अनेक उत्पादने वापरतो. ओठांची काळजी घेताना सर्वात महत्वाचे आहे की, ओठ हायड्रेट राहिले पाहिजेत. ओठांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण मध आणि एव्हकाडो मिसळून हायड्रेटिंग लिप मास्क तयार करू शकता. यासाठी, एका भांड्यात एक चमचा मध, 2 चमचे पिकलेले एव्हकाडो मिसळा. मात्र हे मिश्रण आपल्या आठोवर लावा.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Lipstick will not be spoiled despite applying mask follow these tips)