Madhuri Dixit : धकधक गर्ल माधुरीच्या नाश्त्यात असते ही खास डिश, फक्त 3 मिनिटात तयार, अस्सल मराठमोळे असाल तर…
अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या 'मां-बहन' (Maa-Behan) या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान, तिने तिचा आवडता पदार्थ कोणता, नाश्त्यात तिला काय खायला आवडतं, ते सांगितलं. एवढंच नव्हे तर तिने त्या खास पदार्थाची रेसिपी देखील शेअर केली.

Madhuri Dixit Style Kanda Poha : बॉलीवुडमधील ‘धक-धक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित… ती फक्त तिचा अभिनय, नृत्याने आणि मनमोहक हास्यानेच लोकांचं मन जिंकत नाही तर तिची ग्लोईंग स्किन आणि फिटनेस हाही लोकांना दखल घ्यायला भाग पाडतो. हेल्दी लाइफस्टाइल आणि डाएट हेच तिच्या टोन्ड बॉडीचं रहस्य आहे. सध्या माधुरी तिच्या ‘मां-बहन’ (Maa-Behan) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचदरम्यान एका मुलाखतीत तिने तिला काय खायल आवडतं, फेव्हरिट डिश याबद्दल माहिती दिली.
माधुरी दीक्षित ही पक्की फूडी आहे. तिला वेगवेगळे पदार्थ तर आवडताताच पण पारंपारिक मराठी पदार्थ ती आवडीने खाते. अलीकडेच तिने तिच्या आवडत्या नाश्ता, म्हणजेच ‘कांदे पोह्यांच्या’ तयारीचं गुपित सांगितलं. मात्र, तिची पोहे बनवण्याची पद्धत नेहमीच्या पद्धतींपेक्षा थोडी वेगळी आणि अधिक पौष्टिक आहे. जर तुम्हीही नाश्त्यासाठी एखादा आरोग्यदायी पदार्थ शोधत असाल, तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून पाहू शकता.
माधुरी दीक्षित स्टाइल पोहे का एवढे खास ?
माधुरी जे पोहे खाते, त्या पोह्यांमध्ये ती कुरकुरीत कांदा, शेव आणि मोड आलेली मूग डाळ घालते, ज्यामुळे त्याला एक अनोखी चव येते आणि पौष्टिकही बनतात. पोहे हा साधारणपणे कर्बोदकांचा (carbohydrates) चांगला स्रोत मानला जातो; मात्र, माधुरी यात मोड आलेली कडधान्ये वापरून प्रथिनांचे (protein) प्रमाण वाढवते आणि शेव घालून त्याची चव अधिक खुलवते. या घटकांमुळे केवळ पोह्यांची चव तर सुधारते, ते दिसतातही छान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी हा एक उत्तम नाश्ता ठरतो.
असे बनवा माधुरी दीक्षित स्पेशल कांदे पोहे
साहित्य खालीलप्रमाणे
पोहे : 2 कप
कांदा : 1 मोठा
मोडे आलेले मूग डाळ : ½ कप
शेंगदाणे : 2-3 चमचे
हिरवी मिरची : 2
कढा पत्ता: 8-10
मोहरी, हळद,
पाव चमचा लिंबाचा रस,
कोथिंबीर
सजावटीसाठी बारीक शेव
2 चमचे तेल
चवीनुसार मीठ
कांदे पोहे बनवण्याची कृती –
सर्वात आधी, एका चाळणीत पोहे घ्या आणि चाळून ते स्वच्छ पाण्याने एकदा-दोनदा धुवून घ्या. त्यानंतर, त्यात थोडे मीठ आणि अगदी थोडी साखर मिसळून ते बाजूला ठेवा. त्यानंतर एका कढईत दोन चमचे तेल गरम करा, त्यात शेंगदाणे तळून घ्या आणि ते एका वेगळ्या ताटलीमध्ये काढून ठेवा. त्यानंतर, त्याच तेलात मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांची फोडणी द्या.
त्यानंतर, बारीक चिरलेला कांदा घाला आणि तो हलका गुलाबी व कुरकुरीत होईपर्यंत परता; कारण कांद्याचा थोडासा कुरकुरीतपणा छान लागतो. कांदा परतून झाल्यावर त्यात हळद आणि तिखट (लाल मिरची पूड) घालून थोडे परता आणि मग त्यात पोहे व तळलेले शेंगदाणे मिसळा.
पोहे घातल्यानंतर कढईवर झाकण ठेवा आणि मंद आचेवर साधारण दोन मिनिटे वाफेवर शिजू द्या. शेवटी, गॅस बंद करा, त्यावर लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालून सजवा व गरमागरम पोहे खाऊन घ्या.