
घरांमध्ये गाजर हलवा तयार केला जातोच आणि गरमागरम गाजर हलवा खायला प्रत्येकालाच आवडतो. त्याची गोड चव, सुगंधित सुगंध आणि तोंडात विरघळणारा पोत सर्वांनाच आवडतो. पण कधीकधी दररोज गाजराचा हलवा खाणे कंटाळवाणे वाटते. अशा वेळेस तुम्ही यावेळी गाजराच्या हलव्याऐवजी काहीतरी नवीन पदार्थ बनवू शकता. तर या हिवाळ्यात गाजराच्या हलव्याऐवजी गाजराचे लाडू बनवून तुमच्या हिवाळी आहारात समाविष्ट करा. हे लाडू स्वादिष्ट आहेत आणि बनवायला ही खूप सोपे आहेत. जर तुम्हालाही हे गाजराचे लाडू चाखायचे असतील तर हा लेख तुमच्यासाठी आहे.
या लेखात आपण गाजराचे लाडू बनवण्याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. हे लाडू बनवण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटे लागतात. तर, गाजराचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.
गाजर हे पोषक तत्वांनी समृद्ध असतात. हेल्थलाइनच्या मते, त्यात कॅलरीज, पाणी, प्रथिने, कार्ब्स, फायबर, फॅट, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के1, व्हिटॅमिन बी6 आणि बायोटिन असतात. तर गाजराच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, गाजर हे बीटा-कॅरोटीनच्या प्रमाणामुळे डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. शिवाय त्यात व्हिटॅमिन ए असते, जे डोळे आणि त्वचा दोघांसाठीही फायदेशीर असते. नियमित गाजर खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते आणि वजन कमी करण्यास देखील मदत होते.
साहित्य
गाजर – 500 ग्रॅम साखर – 250 ग्रॅम खवा – 200 ग्रॅम नारळ किस- 200 ग्रॅम मूठभर काजू, बदाम, वेलची पावडर, तूप
गाजराचे लाडू बनवण्यासाठी प्रथम गाजर धुवून त्यांचे 2 ते 3 तुकडे करा. आता कुकरमध्ये पाणी टाकून गाजराचे तुकडे त्यात टाका आणि २ शिट्ट्यांमध्ये गाजर शिजवून घ्या. दोन कुकरच्या शिट्टयांमध्येच गाजर मऊ होतील. आता एक पॅन घ्या, त्यात तूप टाका. आता यामध्ये शिजलेले गाजर परतवून घ्या . गाजर चांगले परतवल्यानंतर त्यात साखर टाका आणि पुन्हा मिक्स करून घ्या. आता त्यात वेलची पावडर, काजू, बदाम आणि खवा घाला आणि गाजराचे मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण थंड होऊ द्या. आता तुमच्या तळहातावर तूप लावा आणि लाडूचा आकार द्या. आता नारळाचा बारीक किस लाडुवर लावा, त्यानंतर त्यावर काजूचा अर्धा तुकडा लावा आणि सर्व्ह करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)