रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नारळ पाण्यात मिसळा लिंबू, होतील अनेक फायदे

| Updated on: Apr 22, 2021 | 10:51 AM

कोरोना विषाणूच्या (कोविड -19) प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी आपण सर्वचजण विविध उपायोजना करत आहोत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नारळ पाण्यात मिसळा लिंबू, होतील अनेक फायदे
नारळ पाणी
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूच्या (कोविड -19) प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी आपण सर्वचजण विविध उपायोजना करत आहोत. त्यासाठी बऱ्याच लोकांनी आपल्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये मोठे बदल केले आहेत. मात्र, यापेक्षाही महत्वाचे आहे की, आपण आहारात जास्तीत-जास्त रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल असेच अन्न् घेतले पाहिजे. तेंव्हाचे आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. आज आम्ही तुम्हाला असे एक सुपरफूड सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकता. (Mix lemon in coconut water to boost immunity)

अर्धा लिंबू नारळाच्या पाण्यात घाला आणि प्या. यामुळे व्हिटॅमिन सी 10 पट वाढते. दुपारच्या जेवणाच्या दोन तासांनंतर तुम्ही त्याचे सेवन करू शकता. तसेच संध्याकाळी देखील तुम्ही हे पिऊ शकता. यामुळ आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी वेळेत जास्त वाढण्यास मदत होते. नारळ पाणी पिण्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो.

नारळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

पोट्यातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्यांमध्येही नारळपाण्यामुळे आराम मिळतो. हे आपल्या शरीरास ऊर्जा देते. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्यांतून आराम मिळतो. नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे पोषक असतात. यामुळे तुमचे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबू सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते (Benefits), त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषांपासून मुक्तता मिळू शकते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घाला आणि प्या यामुळे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी निघून जाण्यास मदत होती. तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असल्यास लिंबाचा रस एक रामबाण उपाय आहे. रक्त येणाऱ्या हिरड्यांवर लिंबाचा रस चोळल्यास रक्त येणे थांबते आणि यामुळे आपले दातही चांगले होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

(Mix lemon in coconut water to boost immunity)