
“आई, आधी मोबाईल दे, मगच जेवण खाईन!” हे वाक्य आता बहुतेक घरांमध्ये ऐकायला मिळते. जेवण आता चव आणि भूक यावर अवलंबून नसून, मोबाईलच्या स्क्रीनशी जोडलेला एक अनुभव बनला आहे. एकेकाळी, कुटुंब एकत्र बसून जेवायचे आणि गप्पा मारायचे, पण आता प्रत्येकाचे लक्ष एका चमचमत्या स्क्रीनकडे असते. मुलांमध्ये ही सवय इतकी खोलवर रुजली आहे की, मोबाईलशिवाय जेवण करण्यास ते स्पष्ट नकार देतात.
पण तुम्हाला माहीत आहे का, की ही सवय केवळ त्यांच्या भुकेवरच नाही, तर त्यांच्या स्वभावावर आणि सामाजिक वर्तनावरही नकारात्मक परिणाम करत आहेत मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या खालीलप्रमाणे
सतत स्क्रीनकडे पाहण्याची सवय असल्यामुळे मुलांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे त्यांना अभ्यासात आणि इतर कामांमध्ये लक्ष लावणे कठीण जाते.
जास्त स्क्रीन टाइममुळे मुले चिडचिडी आणि लवकर रागावणारी बनतात. त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते.
मोबाईलमुळे मुले कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यात रस घेत नाहीत, ज्यामुळे ते एकलकोंडे बनतात आणि कुटुंबापासून दूर जातात.
जेवणाची वेळ ही केवळ पोषण मिळवण्याची नाही, तर भावनिक नाती (emotional connection) जोडण्याची आणि संवाद साधण्याची एक महत्त्वाची वेळ असते. जेव्हा एखादे मूल मोबाईल पाहत जेवते, तेव्हा ते या नात्यांपासून दूर जाते. हळूहळू ही सवय त्यांना आत्ममग्न (self-centered) बनवते, ज्यामुळे ते समाज आणि कुटुंबापासून वेगळे होतात. संवाद आणि भावनांची देवाणघेवाण न झाल्यास, मुलांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता (uneasiness) निर्माण होते, जी नंतर राग आणि एकटेपणामध्ये बदलते.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
लहानपणीच्या या सवयीच पुढे मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. मोबाईलच्या मदतीने मुलांना जेवण भरवणे हा सोपा मार्ग वाटत असला तरी, यामुळे तुमचं मूल हळूहळू एकलकोंडं, चिडचिडं आणि सामाजिकदृष्ट्या कमकुवत बनू शकतं. मुलांना एक चांगला माणूस बनवण्याची जबाबदारी अजूनही पालकांचीच आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)