सापाचा सर्वात मोठा शत्रू लावेल तुमची वाट, कधीच करू नका या 3 चुका; अन्यथा घरात संकट आलंच समजा

Mongoose : तुमच्या घराजवळ झुडपे, बाग, शेती किंवा मोकळी जागा असेल तर उंदीर किंवा सापांच्या शोधात मुंगूस घरात शिरू शकते. अशावेळी खालील चुका टाळणे फायदेशीर ठरेल.

सापाचा सर्वात मोठा शत्रू लावेल तुमची वाट, कधीच करू नका या 3 चुका; अन्यथा घरात संकट आलंच समजा
mongoose and Snake
Image Credit source: AI
| Updated on: May 20, 2026 | 5:12 PM

मुंगूस हा सापाचा शत्रू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मुंगूस हा प्राणी सामान्यतः लाजाळू स्वभावाचा असतो आणि माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र जर तुमच्या घराजवळ झुडपे, बाग, शेती किंवा मोकळी जागा असेल तर उंदीर किंवा सापांच्या शोधात मुंगूस घरात शिरू शकते. उघडे दरवाजे, खिडक्या किंवा भिंतीतील फटीतून ते घरात शिरू शकते. अशी घटना जर घडली तर त्याला घाबरवण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न केला तर हा प्राणी अधिक आक्रमक होऊ शकतो. हा प्राणी घरात शिरल्यास काय करावे ते जाणून घेऊयात.

मुंगुसाला मारू नये

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, मुंगूस चावल्यास गंभीर जखम होऊ शकते. तसेच इन्फेक्शन आणि रेबीजसारख्या धोकादायक आजारांचाही धोका असतो. त्यामुळे घरात किंवा बागेत मुंगूस दिसल्यास त्याला घेरण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये. कारण घाबरलेले मुंगूस स्वतःचा बचाव करण्यासाठी हल्ला करू शकतो. त्याचे दात अतिशय धारदार असल्याने खोल जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्यापासून दूर राहणे कधीही फायदेशीर आहे.

मुंगुसाला खायला देऊ नये

तज्ज्ञांच्या मते, मुंगसाला खाऊ घालणेही टाळावे. मानवी वस्त्यांमध्ये किंवा कचऱ्याजवळ राहणारे मुंगूस अधिक आक्रमक होऊ शकते. जर त्यांना अन्न दिले तर ते पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी येऊ लागतात, ज्यामुळे घरातील लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना धोका वाढू शकतो. त्यामुळे मुंगूस दिसल्यास त्याला दूध किंवा अन्न पदार्थ देणे टाळावे.

मुंगुसाने चावा घेतल्यास डॉक्टरकडे जा

तुमच्या घरात मुंगूस शिरल्यास आणि त्याने चावा घेतल्यास ती जखम किरकोळ समजण्याची चूक करू नये. काही संशोधनांनुसार, मुंगूसच्या चाव्यामुळे स्ट्रेप्टोकोकससारखे गंभीर इन्फेक्शन होऊ शकते. तसेच रेबीजचा संसर्ग होण्याचाही धोका असतो. त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन अँटी-रेबीज इंजेक्शन घेणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, घरात मुंगूस शिरल्यास सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे घराचे दरवाजे उघडे ठेवून त्याला स्वतः बाहेर जाण्याची संधी देणे. त्याच्यावर ओरडणे किंवा गोंधळ घालणे टाळावे. गरज पडल्यास प्राणी बचाव पथकाशी संपर्क साधावा आणि त्याला सुरक्षित बाहेर सोडावे.

 

Follow Us