AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिफा विश्वचषकातून 40 संघ आऊट, आता 8 संघ जेतेपदाच्या शर्यतीत; असं आहे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आठ संघांनी धडक मारली आहे. या फेरीचे सामने 9 आणि 10 जुलैच्या मध्यरात्री होणार आहेत. या फेरीच्या सामन्यातून उपांत्य फेरीचे संघ ठरणार आहेत.

फिफा विश्वचषकातून 40 संघ आऊट, आता 8 संघ जेतेपदाच्या शर्यतीत; असं आहे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक
फिफा विश्वचषकातून 40 संघ आऊट, आता फक्त 8 संघ जेतेपदाच्या शर्यतीत; असं आहे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रकImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 09, 2026 | 4:08 PM
Share

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या राउंड ऑफ 16 फेरीतून उपांत्यपूर्व फेरीत आठ संघांची वर्णी लागली आहे. आता उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी आठ संघांमध्ये चुरस असणार आहे. या स्पर्धेतून एकूण 48 संघांनी भाग घेतला होता. त्यापैकी 40 संघ स्पर्धेतून बाद झाले आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेतून तीनही यजमान देश बाद झाले आहेत. आता उपांत्यपूर्व फेरीत आणखी 4 संघ बाद होतील. उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्स, मोरक्को, स्पेन, बेल्जियम, नॉर्व, इंग्लंड, अर्जेंटीना आणि स्वित्झर्लंड या संघांनी एन्ट्री मारली आहे. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या आठ संघांची खासियत म्हणजे. यात 4 संघांनी यापूर्वी जेतेपद मिळवलं आहे. तर चार संघ नवे दावेदार आहे. त्यामुळे पुढच्या फेरीचं तिकीट कोणत्या चार संघांना मिळणार याची उत्सुकता आहे.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात नॉर्वे संघाने प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. बलाढ्य ब्राझीलचा पराभव करून एन्ट्री मारिली आहे. तर मोरक्कोने सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अशी कामगिरी करमारा पहिला अफ्रिकन देश आहे. स्वित्झर्लंडने 72 वर्षांनी पहिल्यांदाच अंतिम 8 संघात पोहोचला आहे. यापूर्वी 1954 मध्ये ही कामगिरी केली होती. बेल्जियमही जेतेपदाचा नवा दावेदार आहे. पण यापूर्वी 2018 मध्ये तिसरं स्थान पटकावलं होतं. तर 2014 मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तर 1986 मध्ये चौथ्या स्थानावर होता.

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

सामना क्रमांक स्पर्धा तारीख वेळ (IST) स्थळ
QF 1 फ्रान्स विरुद्ध मोरोक्को 10 जुलै, 2026 रात्री 01:30 बॉस्टन स्टेडियम, मॅसॅच्युसेट्स
QF 2 स्पेन विरुद्ध बेल्जियम 11जुलै, 2026 रात्री 12:30 लॉस एंजेलिस स्टेडियम, कॅलिफोर्निया
QF 3 नॉर्वे विरुद्ध इंग्लंड 12 जुलै, 2026 रात्री 02:30वाजता मियामी स्टेडियम, फ्लोरिडा
QF 4 अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड 12 जुलै, 2026 सकाळी 6:30 वाजता कॅन्सस सिटी स्टेडियम, मिसूरी

आतापर्यंत उपांत्यपूर्व फेरीत असलेल्या 4 माजी चॅम्पियन्स संघांमध्ये अर्जेंटीना, फ्रान्स, इंग्लंड आणि स्पेन हे देश आहेत. अर्जेंटीनाने आतापर्यंत तीन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या वर्षी जेतेपद मिळवलं होतं. तर फ्रान्स दोन वेळा जगजेता ठरला आहे. तसेच इंग्लंड आणि स्पेनने प्रत्येकी एकदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.

Follow Us
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...