AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंच्या नगरसेवकाच्या अडचणी वाढल्या! कल्याणमधील डॉक्टारांच्या मारहाण प्रकरणात मोठ ट्वीस्ट, थेट...

शिंदेंच्या नगरसेवकाच्या अडचणी वाढल्या! कल्याणमधील डॉक्टारांच्या मारहाण प्रकरणात मोठ ट्वीस्ट, थेट…

| Updated on: Jul 09, 2026 | 3:32 PM
Share

कल्याण-डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली.

रमेश म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. रुग्णसेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांच्या सुरक्षिततेची हमी सरकारने द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दरम्यान, वाढता राजकीय दबाव आणि सर्व स्तरातून होत असलेल्या टीकेनंतर पोलिसांनी कारवाईची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली. अखेर रमेश म्हात्रे यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अटकेनंतर रमेश म्हात्रे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हायपरटेन्शनचा त्रास जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. आजच त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Published on: Jul 09, 2026 03:32 PM

Follow Us