New Year 2021 | नव्या वर्षाच्या पार्टीत रमले पर्यटक, गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर जल्लोष सुरूच!

| Updated on: Jan 01, 2021 | 10:38 AM

नवीन वर्षाचे आगमन झाले आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि पार्टी करण्यासाठी बरेच लोक शहरापासून लांब गेले आहेत.

New Year 2021 | नव्या वर्षाच्या पार्टीत रमले पर्यटक, गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर जल्लोष सुरूच!
Follow us on

मुंबई : नवीन वर्षाचे आगमन झाले आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि पार्टी करण्यासाठी बरेच लोक शहरापासून लांब गेले आहेत. कोरोनामुळे सध्या सगळ्याच गोष्टींवर बरेच निर्बंध लादण्यात आले आहेत्त. यात पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोव्यामध्येही कडक नियम लागू करण्यात आले होते. यामुळे गोव्यात या वेळी कमी पर्यटक हजेरी लावतील अशी अपेक्षा होती. परंतु, कोरोना साथीच्या काळात लोक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कुटुंब आणि मित्रांसह या गोव्याच्या किनाऱ्यावर नवीन वर्षाचा आनंद लुटत आहेत (New year 2021 celebration still going on Goa beaches).

नवीन वर्षाच्या उत्सवासाठी गोव्यात मोठ्या संख्येत पर्यटक हजर होते. पर्यटनमंत्री मनोहर अजगांवकर यांनी बुधवारी यासंदर्भात एएनआयला माहिती दिली. ते म्हणाले, ‘पर्यटक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आणि सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्यात येऊ लागले आहेत. गोवा ही देवाची देणगी आहे कारण ती नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे आणि लोक त्याचा आनंद घेण्यासाठीच येथे येतात. इथे येणारे सगळे पर्यटक कोरोनाबाबत सावधगिरी बाळगून आनंद घेत आहेत.’ पुढे ते म्हणाले, ‘पर्यटक गोव्यात येत आहेत, हे गोव्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या चांगलेच आहे.’

कोरोना तणावातून मुक्ती!

या दरम्यान पर्यटकांनी देखील त्यांच्या भवना व्यक्त केल्या. एका पर्यटकाने सांगितले की, ‘आम्ही गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचा पुरेपूर आनंद घेत आहोत. आम्ही येथे पहिल्यांदाच आलो आणि बर्‍याच ठिकाणांना भेट दिली. येथे बरीच रोमांचक ठिकाणे आहेत.’ कुटुंबासमवेत पहिल्यांदाच गोव्याला भेट देण्यासाठी आलेले आणखी एक पर्यटक म्हणाले की, ‘लॉकडाउन आणि कोरोना व्हायरस संसर्गाच्या आजारामुळे आम्ही पूर्णपणे आमच्या घरात अडकलो होतो. परंतु, आता आम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने पार्टीसाठी बाहेर पडलो आहोत. नववर्षाचे निमित्त साधून बाहेर आल्याने कोरोनाच्या ताणातूनदेखील मुक्ती मिळाली आहे.’

अगरतलाहून गोव्यात आलेला राजीव म्हणतात, ‘मी दरवर्षी कुटुंब आणि मित्रांसमवेत गोव्याला जातो. विशेषत: नवीन वर्षाच्या निमित्ताने इथे येणे मला खूप आवडते.’ गोव्यातील अनेक ठिकाणी पर्यटक समुद्रकिनारे, कॅसिनो, क्लब, चर्च आणि इतर पर्यटन स्थळी आनंद लुटताना दिसले. पर्यटकांनी फोटो काढत, म्युझिक आणि धमाल नृत्याचा आनंद घेत नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.

(New year 2021 celebration still going on Goa beaches)

हेही वाचा :