नव्या वर्षात सुट्ट्या असूनही नाही लुटता येणार सुट्ट्यांचा आनंद! का ते जाणून घ्या…

आपणही नवीन वर्षात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर या सुट्टींची आधीपासूनच आगाऊ योजना तयार केली पाहिजे.

नव्या वर्षात सुट्ट्या असूनही नाही लुटता येणार सुट्ट्यांचा आनंद! का ते जाणून घ्या...
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 5:51 PM

मुंबई : 2021 हे नवे वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यंदाचे आपले अर्ध्याहून अधिक वर्ष केवळ घरातून काम करण्यात व्यतीत झाले आहे. आता बऱ्याच जणांनी पुढच्या वर्षी कुठेतरी जाण्यासाठी किंवा फिरण्याची योजना तयार केल्या आहेत. अशा परिस्थितीत आपणही नवीन वर्षात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर या सुट्टींची आधीपासूनच आगाऊ योजना तयार केली पाहिजे. कारण, 2021मध्ये अशा अनेक सुट्ट्या नेमक्या शनिवार किंवा रविवारी येणार आहेत. त्यामुळे आपल्या रेकॉर्डवरून बर्‍याच सुट्ट्या कमी होणार आहेत (New year holidays calendar public holidays on weekend).

जरी अनेक सुट्या शनिवार व रविवारच्या दिवशी असल्या तरी, काही सुट्ट्या आठवड्याच्या शेवटाला लागूनही आल्या आहेत. अशा वेळी, आपण 3 दिवसांच्या सुट्टीचा, अर्थात सुट्टीसह, शनिवार व रविवारचा आनंद घेऊ शकाल. नवीन वर्षात सुमारे 10 लाँग विकेंड येणार आहे. तर, 9 वेळा या सुट्ट्या नेमक्या आपल्या सुट्ट्यांच्या दिवशी येणार आहेत.

या शनिवार व रविवार रोजी येणाऱ्या सुट्ट्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया. या सुट्ट्यांबद्दल आधीच जाणून घेतल्याने आपण आगाऊ योजना आखू शकता…

शनिवारी येणाऱ्या सुट्ट्या

यावेळी अशा अनेक सुट्ट्या आहेत, ज्या शनिवारी येणार आहेत. प्रत्येक वेळी, ज्या सुट्ट्यांची मजा आपण इतर दिवशी घेत आलो आहोत, यावेळी त्याच सुट्ट्यांमुळे आपल्याला आणखी एक दिवस ऑफिसला जावे लागणार आहे. 2021 या नवीन वर्षामध्ये, 27 फेब्रुवारी (गुरु रविदास जयंती), 21 ऑगस्ट (ओणम), 2 ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), 25 डिसेंबर (ख्रिसमस) या सुट्ट्या शनिवारी आल्या आहेत. जर, तुम्हाला शनिवार सुट्टी असेल तर, या वेळेस या सुट्ट्यांचा वेगळा आनंद घेता येणार नाही (New year holidays calendar public holidays on weekend).

रविवारी येणाऱ्या सुट्ट्या

यावेळी बर्‍याच सुट्ट्या रविवारी येत आहेत. ज्यांना फक्त रविवारी सुट्टी असते, असे लोक या सणांच्या सुट्ट्यांची वाट बघत असतात. कारण, या सुट्ट्यांमुळे त्यांना आठवड्यातून दोन दिवस विश्रांती घेण्याची संधी मिळते. परंतु, यावेळी त्या लोकांना बर्‍याच वेळा ही संधी गमवावी लागणार आहे. येत्या वर्षात म्हणजेच 2021मध्ये,  28 मार्च (होलिका दहन), 4 एप्रिल (ईस्टर दिन), 25 एप्रिल (महावीर जयंती), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), 22 ऑगस्ट (रक्षाबंधन) हे सुट्ट्यांचे दिवस रविवारी येणार आहेत. म्हणूनच, या सुट्टीचा अतिरिक्त आनंद आपण घेऊ शकणार नाही.

स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट, गांधी जयंती, बौद्ध पौर्णिमा, ख्रिसमस, दसरा, दिवाळी, गुड फ्रायडे, गुरु नानक जयंती, ईद-उल-फितर, बकरी ईद, महावीर जयंती, मोहर्रम आणि ईद-ए-मिलाद या सुट्ट्या केंद्र सरकारतर्फे दिल्या जातात. तर, होळी, जन्माष्टमी, महाशिवरात्री, मकर सक्रांती, रथयात्रा, ओणम, पोंगल, बसंत पंचमी इत्यादी सुट्टीचा निर्णय राज्याच्या आधारे घेतला जातो.

(New year holidays calendar public holidays on weekend)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.