AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेहच नाही तर अनेक आजारापासून वाचवते रताळे, जाणून घ्या त्याचे इतर फायदे

रताळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियम, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे आढळतात. ते खाल्ल्याने मधुमेह आणि हृदयविकार टाळण्यास मदत होते. रताळ्याचा आहारात समावेश करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

मधुमेहच नाही तर अनेक आजारापासून वाचवते रताळे, जाणून घ्या त्याचे इतर फायदे
Sweet Potato
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 23, 2023 | 7:42 PM
Share

Benefits of Sweet potato : रताळे आपण आहारात सहसा समाविष्ट करत नाही. पण रताळे खाण्याचे अनेक फायदे आहेत. जे खूप कमी लोकांना माहित आहेत. रताळ्यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वे यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. रताळे खाल्याने अनेक आजार टाळता येतात. रताळ्याचा आहारात समावेश केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

मधुमेह प्रतिबंध

रताळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. फायबर मधुमेहाचा धोका कमी करण्यास देखील मदत करू शकते. रताळ्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते, त्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते.

हृदयरोग प्रतिबंधक

रताळ्यामध्ये फायबर आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रताळ्यामध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. चांगले कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ शरीरातून यकृताकडे घेऊन जाते, तेथून ते शरीराबाहेर फिल्टर केले जाते.

पचन सुधारते

रताळ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, जे पचनासाठी खूप महत्वाचे आहे. ते खाल्ल्याने अन्न आतड्यांमध्ये सहज हलू शकते, ज्यामुळे पोषक तत्वांचे शोषण सुलभ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील कमी होते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

रताळे वजन कमी करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले फायबर पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तुमच्या आहारात त्याचा समावेश करून तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सोपा होऊ शकतो. रताळ्यामध्ये फायबर असते, जे हळूहळू पचते आणि तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे तुम्ही जास्त खात नाही आणि वजन वाढण्याची समस्या कमी होते.

रक्तदाब नियंत्रित करते

रताळ्यामध्ये पोटॅशियम आढळते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रणात ठेवल्यास हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात यांसारखे धोकादायक आजार टाळता येतात. त्यामुळे रताळ्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना