Papaya Seeds : पपईच नाही तर त्याच्या बिया देखील ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर

papaya seeds : पपई ज्या प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचप्रकारे पपईच्या बिया देखील तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. पपईच्या बियाचे फायदे काय आहे. कशासाठी त्याचा वापर केला जावू शकतो. जाणून घ्या.

Papaya Seeds : पपईच नाही तर त्याच्या बिया देखील ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर
papaya
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 12:17 AM

Papaya Seeds : पपई हे एक चविष्ट फळ आहे, हे विशेषत: पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी खाल्ले जाते, परंतु अनेकांना माहित नाही की त्याच्या बिया देखील महत्त्वाच्या आहेत. पपईच्या बियांची चव थोडी मसालेदार आणि काळी मिरीसारखी असते. त्याचा योग्य वापर केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात. पपईच्या बिया उन्हात वाळवा आणि त्यांची पावडर करा. तुम्ही ही पावडर जेवणात मिसळू शकता किंवा मसाला म्हणून वापरू शकता.

पपईच्या बिया खाण्याचे फायदे

1. पचन होण्यासाठी

पपईच्या बियांमध्ये एक विशेष प्रकारचे एन्झाइम असते ज्याला पपेन म्हणतात, त्याच्या मदतीने पचन सुधारले जाऊ शकते. जेवणानंतर एक चमचा पपईच्या बिया खावू शकतात. असे केल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि सूज येणे यासारख्या समस्या उद्भवणार नाहीत.

2. रोगप्रतिकारशक्ती वाढेल

पपईच्या बिया व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्त्रोत मानल्या जातात, हे एक पोषक तत्व आहे जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या बिया खाल्ल्याने सर्दी, खोकला, सर्दी, फ्लू आणि विषाणूजन्य आजारांचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

3. वजन आटोक्यात आणण्यास मदत

पपईच्या बिया खाल्ल्याने वाढलेले वजन आटोक्यात राहण्यास मदत होते हे कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल. यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही.

4. कर्करोग प्रतिबंध

कॅन्सर हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. कॅन्सर टाळण्यासाठी तुम्ही नियमितपणे पपईच्या बिया खावू शकता. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की त्याच्या बियांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे काही कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबते.

राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.
'ते नेहमीसारखं उशीर...', शिंदेंच्या उशिरा येण्यावर दादांची टोलेबाजी
'ते नेहमीसारखं उशीर...', शिंदेंच्या उशिरा येण्यावर दादांची टोलेबाजी.
'किमान तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका', फडणवीसांनी पवारांना दिला दाखला
'किमान तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका', फडणवीसांनी पवारांना दिला दाखला.
सोमय्यांचा अभ्यास खोटा? अजितदादा DCM अन् दुसऱ्या दिवशी संपत्तीची वापसी
सोमय्यांचा अभ्यास खोटा? अजितदादा DCM अन् दुसऱ्या दिवशी संपत्तीची वापसी.
सोलापुरातील मारकडवाडी राजकीय केंद्र,शरद पवार ग्रामस्थांशी संवाद साधणार
सोलापुरातील मारकडवाडी राजकीय केंद्र,शरद पवार ग्रामस्थांशी संवाद साधणार.
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचे संकेत, शिवसेनेची संमती की विरोध?
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचे संकेत, शिवसेनेची संमती की विरोध?.
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO.
'मारकडवाडीत शरद पवार माझे काम...,' काय म्हणाले राम सातपुते
'मारकडवाडीत शरद पवार माझे काम...,' काय म्हणाले राम सातपुते.