
कर्नाटक राज्यात नुकतीच पाणी पुरी आणि इतर खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रस्त्यांवरील खाद्यपदार्थांसह चांगल्या पॉश रेस्टॉरंटमधील अनेक खाद्यपदार्थांचे नमूने तपासले गेले. त्यावेळी पाणीपुरीतील पाण्याला रंग देण्यासाठी कृत्रिम रंग वापरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच कॉटन कँडी लहान मुले आवडीने खातात या कॉटन कँडीसाठी देखील वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम रंगात चक्क रोडामीन – बी नामक घटक आढळला आहे या घटकामुळे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला आमंत्रण मिळत असल्याचे उघडकीस आले आहे. खाद्यपदार्थांमधील रासायनिक रंगांमुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. कर्नाटक सरकारने रोडामीन – बी नामक फूड कलरवर नुकतीच बंदी घातलेली आहे. या कृत्रिम रंगातील रोडामीन – बी ( Rhodamine – B ) नामक घटकाने मानवी शरीरावर दीर्घकालीन परीणाम होतात. त्यात कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला निमंत्रण मिळत असल्याचे भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने ( FSSAI ) म्हटले आहे. ...