
विमान प्रवास करताना आपण फार काही गोष्टी लक्षात घेत नाहीत. पण पायलट आणि एअर होस्टेस यांना अनेक अटी-नियम लागू करण्यात आलेले असतात. तसेच काही गोष्टी पायलट आणि एअर होस्टेसला विमानात काही गोष्टीं करण्यास परवानगी नसते. या गोष्टी पूर्णपणे करण्यास मनाई असते. पण कदाचित त्या गोष्टींकडे आपलेही फार लक्ष जात नाही किंवा त्यावर तेवढा विचार केला जात नाही. सोबतच लोकांना विमानांशी संबंधित माहिती जाणून घेण्यात रसही असतो. चला तर मग जाणून घेऊयात की त्या कोणत्या गोष्टी आहेत.
परफ्यूमचा वास
जेव्हा तुम्ही विमानात प्रवास करता तेव्हा तुम्हाला विमानात थोडासा सुगंध जाणवत असेल, पण तुम्ही कधी हे लक्षात घेतलं का? की जेव्हा जेव्हा पायलट किंवा एअर होस्टेस तुमच्या जवळून जातात तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून कोणत्याची परफ्यूमचा सुगंध कधीच येत नाही.कारण त्यामागे अनेक कारणे आहेत.
परफ्यूम का वापरू शकत नाही?
पायलट आणि एअर होस्टेस विमान प्रवासादरम्यान परफ्यूम वापरू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे तीव्र वासामुळे पायलटचे लक्ष विचलित होऊ शकते, ज्यामुळे उड्डाण सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो.
दारू
परफ्यूममध्ये अनेकदा अल्कोहोल असते. प्रत्येक उड्डाणापूर्वी वैमानिकांची श्वास विश्लेषक चाचणी केली जाते. जर परफ्यूम किंवा इतर अल्कोहोल-आधारित उत्पादने चाचणीवर परिणाम करत असतील तर वैमानिकाला निलंबित केले जाऊ शकते.
तीव्र वासाचा त्रास
कधीकधी तीव्र सुगंधामुळे विमानात उपस्थित प्रवाशांना त्रास होऊ शकतो. काही लोकांना परफ्यूमची ऍलर्जी असते, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
केवळ परफ्यूमच नाही तर या गोष्टींवरही बंदी असते
उड्डाणादरम्यान, पायलट आणि एअर होस्टेस सॅनिटायझर, माउथवॉश, टूथपेस्ट किंवा अल्कोहोल-आधारित कोणतेही उत्पादन देखील वापरू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारे मद्यपान करू शकत नाही अन्यथा कडक कारवाई करण्यात येते.
औषधांसाठीही नियम कडक आहेत.
डीजीसीएच्या नियमांनुसार, जर एखादा पायलट किंवा क्रू मेंबर कोणतेही औषध घेत असेल, तर त्याने उड्डाण करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही प्रकारची औषधे घेऊन फ्लाइट चालवण्यास पायलटला सक्त मनाई असते. त्यामुळे विमान चालवताना अडचणी येऊ शकतात.