AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! 54 देश एकवटले, भारताकडे सर्वात मोठी जबाबदारी, अमेरिकेसोबत ट्रेड डील होताच चीनला पहिला हादरा

भारताची अमेरिकेसोबत मोठी ट्रेड डील झाली आहे, या ट्रेड डीलनंतर अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे, दरम्यान त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तारावर घडामोडींना वेग आला असून, भारतासाठी मोठी गुडन्यूज आहे.

मोठी बातमी! 54 देश एकवटले, भारताकडे सर्वात मोठी जबाबदारी, अमेरिकेसोबत ट्रेड डील होताच चीनला पहिला हादरा
America, ChinaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 05, 2026 | 3:44 PM
Share

अमेरिका आणि भारतामध्ये एक मोठी ट्रेड डील झाली आहे, या ट्रेड डीलचा भरताला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिकेपूर्वी भारतानं युरोपियन यूनियन सोबत देखील एक ट्रेड डील केली आहे. अमेरिकेसोबत ट्रेड डील होताच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, दरम्यान आता भारतासाठी आणखी एक मोठी गुडन्यूज समोर आली आहे. आता जगातील शक्तिशाली देशांची ताकद ही फक्त कच्च्या तेलावर ठरणार नाहीये तर त्यात रेअर अर्थ मिनरल्सचा देखील समावेश झाला आहे. अमेरिकेनं चीनविरोधात मोठा डाव खेळला आहे. अमेरिकेनं भारतासह तब्बल 54 देशांना एकत्र करून आंतरराष्ट्रीय खनिज समूह तयार करण्यास सुरुवात केली आहे, रेअर अर्थ क्षेत्रात चीनची मक्तेदारी मोडून काढणं हा या समूहाचा मुख्य उद्देश असणार आहे, या समुहामध्ये भारताकडे महत्त्वाची जबाबदारी असणार आहे, सध्या तब्बल 90 टक्के रेअर अर्थ खनिजांच्या पुरवठ्यावर चीनची मक्तेदारी आहे, त्यामुळे हा समूह किती महत्त्वाचा आहे? यावरून कल्पना येते.

वाशिंग्टमध्ये आयोजित क्रिटिकल मिनरल्स मिनिस्टीरिय बैठक 2026 मध्ये या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, उपराष्ट्रपती जेड वेंन्स आणि आर्थ मंत्री स्कॉट बेसेन्ट देखील सहभागी झाले होते. भारताच्या वतीनं या बैठकीमध्ये पराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली आहे, यावरून आता हे स्पष्ट होत आहे की, भारत या 54 देशांच्या समूह संघटनेमध्ये केंद्रस्थानी असणार आहे.

30 अब्ज डॉलरची गुंतवणूक

चीनला टक्कर देण्यासाठी आणि चीनची रेअर अर्थ मिनरल्समधील मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत, ज्यामध्ये पहिला गट आहे FORGE या देशांवर रेअर अर्थ मिनरल्सची किंमत आणि पुरवठा सुरक्षित तसेच स्थिर करण्याची जबाबदारी आहे, ज्याचं नेतृत्व दक्षिण कोरियावर सोपवण्यात आलं आहे, तर दुसरा गट आहे Pax Silica हा समुह सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हाय-टेक उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या खनिजांचा पुरवठा यातील चीनची मक्तेदारी कमी करण्यावर भर देणार आहे, यामध्ये भारत एक महत्त्वाचा आधारस्तभ असून, भारताची भूमिका निर्णयाक ठरणार आहे. यासाठी अमेरिकेकडून तब्बल 30 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती