AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : काही फरक पडत नाही, कोणी हरलं काय आणि जिंकलं काय? अंपायर कमावतात बक्कळ पैसा; आकडा ऐकून…

क्रिकेटचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. काही तरुण क्रिकेट क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहतात, परंतु जर तुम्ही खेळाडू बनण्यात अयशस्वी झालात तर निराश होण्याची गरज नाही. तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे, ज्या नोकरीतून लाखो कवमू शकता.

T20 World Cup : काही फरक पडत नाही, कोणी हरलं काय आणि जिंकलं काय? अंपायर कमावतात बक्कळ पैसा; आकडा ऐकून...
किती असतो अंपायरचा पगार ?
| Updated on: Feb 05, 2026 | 3:44 PM
Share

भारतात क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही तर एक आवड आहे, क्रिकेट म्हटलं जोश संचारतो.म्हणूनच क्रिकेटचे करोडो चाहते आहेत. मॅच पाहण्यासोबतच कित्येक लोकांना सामना खेळायलाही आवडते. काही लोक असे आहेत ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे पण क्रिकेटमध्ये करिअर करणे म्हणजे फक्त खेळाडू बनणं इतकंच नसतं. जर तुम्हाला क्रिकेटचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही अंपायर (पंच) देखील बनू शकता. जर ज्ञान असेल,  क्रिकेटचे सर्व नियम चांगले माहित असतील, तर तुम्ही पंचगिरी देखील करू शकता, म्हणजेच अपंयारही बनू शकता.  बीसीसीआय आणि आयसीसी सारख्या मोठ्या मंडळांचे अंपायर बनून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

अंपायर बनण्यासाठी पात्रता काय ?

क्रिकेट सामन्यातील पंच किंवा अंपायर बनण्यासाठी, प्रथम क्रिकेटशी संबंधित सर्व नियमांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासोबतच निर्णय घेण्याची क्षमता, बोलण्याचे कौशल्य आणि शारीरिक तंदुरुस्ती देखील खूप महत्त्वाची असते. एवढंच नव्हे तर तुम्हाला राज्य क्रिकेट संघटनेचे सदस्यत्व घ्यावं लागतं. राज्य क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या सामन्यांमध्ये तुम्हाला पंचगिरी सुरू करावी लागते. त्यानंतर, संघटना तुम्हाला अधिकृत करते.

राज्य पातळीवर अंपायर म्हणून 3 वर्षांच्या अनुभवानंतर, बीसीसीआय लेव्हल 1 परीक्षेसाठी अर्ज करता येतो. पंच होण्यासाठी, तुम्हाला लेव्हल-1 परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हा पेपर दरवर्षी बीसीसीआय आयोजित करते. पेपरपूर्वी कोचिंग क्लास असतो. परीक्षेनंतर, उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाते.

ज्या उमेदवाराची निवड होते त्यानंतर त्याला एक इंडक्शन कोर्स दिला जातो. ज्यामध्ये त्याला अंपायरिंगबद्दल सांगितले जाते. त्यानंतर, मुलाखत आयोजित केली जाते. जो या मुलाखतीत किंवा इंटरव्ह्यूमध्ये पास होतो, त्याचा लेव्हल-2 परीक्षेत समावेष केला जातो.  पुढे वैद्यकीय चाचणीनंतर त्याला बीसीसीआय पंच किंवा अंपायर बनवलं जातं. कोणत्याही संघाचा विजय किंवा पराभव पंचांच्या निर्णयावरच ठरवला जातो.

अंपायरिगंच प्रशिक्षण कुठे होतं ?

भारतात अंपायरिगंच प्रशिक्षण बेंगळुरू येथील पंच अकादमीमध्ये होते.

अंपायरला पगार किती असतो ?

जर अंपायरच्या पगाराबद्दल बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचांचे पगार खूप जास्त असतात. आयसीसी सामन्यासाठी अंपायरची फी 2 ते 3 लाखांपर्यंत असते. जर आपण देशांतर्गत क्रिकेटबद्दल बोललो तर प्रत्येक सामन्यासाठी शुल्क हे 40 ते 50 हजारांदरम्यान असते.

Follow Us
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच