Mushroom Pizza: ओव्हनशिवाय घरीच बनवा मऊ आणि चविष्ट ‘मशरूम पिझ्झा’, जाणून घ्या रेसिपी

Mushroom Pizza: बाहेरचा पिझ्झा खाणं नेहमीच शक्य नसतं आणि ते आरोग्यासाठी योग्य देखील नाही. पण घरातच तुम्ही मऊ आणि चविष्ट 'मशरूम पिझ्झा' घरात करु शकता. जाणून घ्या रेसिपी

Mushroom Pizza: ओव्हनशिवाय घरीच बनवा मऊ आणि चविष्ट मशरूम पिझ्झा, जाणून घ्या रेसिपी
| Updated on: Nov 02, 2026 | 3:23 PM

Mushroom Pizza: पिझ्झाचं नाव जरी काढलं तरी, लहान मुलांपासून मोठ्यांच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटतं. पण बाहेरचा पिझ्झा खाणं नेहमीच शक्य नसतं आणि ते आरोग्यासाठी योग्य देखील नाही. मात्र घरी ओव्हन नसल्यामुळे अनेकदा घरी पिझ्झा बनवता येत नाही. पण तुमच्या घरी ओव्हन नसेल तरी, तुम्ही घरी पिझ्झा तयार करु शकतात. जर तुम्हीही याच कारणामुळे पिझ्झा बनवू शकत नसाल, तर प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार यांची ही खास रेसिपी तुमच्यासाठी आहे. त्यांनी ओव्हनशिवाय, पॅनवर अगदी स्वादिष्ट आणि परफेक्ट मशरूम पिझ्झा बनवण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे, जी तुम्ही घरी अगदी कमी वेळात तयार करू शकता.

पिझ्झासाठी लागणारं साहित्य

Loading...

पीठ – 1 कप, गव्हाचं पीठ – ¼ कप, बेकिंग पावडर – अर्धा चमचा, बेकिंग सोडा – अर्धा चमचा, तेल -1 मोठा चमचा, मीठ – चवीनुसार, दही – 3 मोठे चमचे

टॉपिंगसाठी लागणारे साहित्य

ऑलिव्ह तेल – 2 मोठे चमचे शिमला मिरची – 2 (चिरलेली), कांदा – 1 (चिरलेला), मशरूम – 3 – 4 (चिरलेले), टोमॅटो – 1 (चिरलेला), मिरचीचे तुकडे – 1 चमचा, ओरेगॅनो – 1 चमचा, तुळशीची ताजी पाने – 4, मीठ – चवीनुसार

पिझ्झा सॉससाठी लागणारं साहित्य

तेल – 1 मोठा चमचा, लसणाच्या पाकळ्या – 2 ते 3 (बारीक चिरलेल्या), कांदा – 1 मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला), टोमॅटो पेस्ट – ½ कप, साखर – ½ चमचा, व्हिनेगर – अर्धा चमचा, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स – ½-½ टीस्पून, मीठ – चवीनुसार, मोझारेला चीज (किसलेले) – ⅓ कप

कसा बनवाल ‘मशरूम पिझ्झा’

एका मोठ्या भांड्यात मैदा, गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, तेल, मीठ आणि दही घालून चांगले मिसळा. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. पीठ गुळगुळीत होईपर्यंत 5-6 मिनिटं मळा. नंतर ते झाकून सुमारे 1 तासासाठी बाजूला ठेवा.

त्यानंतर एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा, सिमला मिरची, मशरूम आणि टोमॅटो घाला. मीठ, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घालून भाज्या हलक्या हाताने परता आणि थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.

त्यानंतर त्याच कढईत थोडं अधिक तेल गरम करा. त्यात लसूण आणि कांदा घालून परतून घ्या. आता त्यात टोमॅटो प्युरी, साखर, व्हिनेगर, मीठ, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घाला. सॉसचं पाणी आटेपर्यंत शिजवा आणि बाजूला ठेवा. त्यानंतर पिठाचा गोळा बनवा आणि तो रोटीपेक्षा थोडा जाडसर लाटा. काट्याच्या साहाय्याने त्यावर लहान छिद्रे करा. आता लाटलेली रोटी तव्यावर ठेवा आणि मंद आचेवर एका बाजूने भाजून घ्या व नंतर पलटा.

यानंतर, त्यावर तयार पिझ्झा सॉस पसरवा, किसलेले मोझारेला चीज भुरभुरा आणि त्यात उकडलेल्या भाज्या व तुळशीची पाने घाला. वरून आणखी थोडे चीज भुरभुरा. पॅन झाका आणि चीज वितळेपर्यंत मंद आचेवर शिजवा. तुमचा गरमागरम मशरूम पॅन पिझ्झा तयार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us