तुमच्याकडे गोड बातमी आहे..? मग चुकूनही पहिल्या 3 महिन्यात हे करू नका…

| Updated on: Jan 05, 2022 | 9:17 PM

आपण आई होणार हे कळल्यावर पहिले तीन महिने त्या महिलेसाठी खूप खास असतात. त्याचा आयुष्यात अनेक बदल होतात. सुरुवातीच्या तीन महिन्यात अनेक महिलांना खूप त्रास होतो. तर काहींना जाणवतही नाही. हे तीन महिने आनंदात जावं म्हणून आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत.

तुमच्याकडे गोड बातमी आहे..? मग चुकूनही पहिल्या 3 महिन्यात हे करू नका...
गर्भावस्था प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

आई होण्याची चाहूल लागल्यापासून ते आई होण्यापर्यंतचे हे 9 महिने खूप खास असतात. यातील पहिले तीन महिने फार महत्त्वाचे असतात. या तीन महिन्यात बाळ गर्भात स्थिरावतो. तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात. महिलांना उलटीचा त्रास, काही खाण्याची इच्छा नसते, किचनमधील फोडींचा वास सहन होत नाही, पोट खराब होणे, मूड स्विंग होणं इत्यादी त्रास होतो. या तीन महिन्यांचा काळात गर्भात बाळ झपाट्याने वाढ असतं. या तीन महिन्यात कुठल्या गोष्टी करू नयेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

पहिल्या तीन महिन्यात या गोष्टी नका करू
1. पहिल्या तीन महिन्यात मसालेदार, तेलकट जेवण टाळा.
2. ज्या पदार्थांनी एसिडिटी किंवा उल्टी सारखं वाटतं ते पदार्थ टाळावेत.
3. पहिले तीन महिने कुठलेही जड वस्तू उचलू नका. त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो.
4. जॉगिंग तसंच जीममध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचे कार्डिओ वर्कआऊट करू नये.
5. रोज 40 ते 45 मिनिट वॉक करा. सर्दी–खोकल्या झाल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवणे.
6. डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठलीही औषध घेऊ नये.
7. बेकरी, जंक फूड खाऊ नयेत.
8. वेळोवेळी ब्लड प्रेशर, शूगर, थायरॉयडची टेस्ट करा.
9. या दिवसांमध्ये मद्यपान करू नका, सिगरेट घेऊ नका.
आता या 3 महिन्यात काय करायला हवं
1. पहिल्या तीन महिन्यात काही नियमांचं काटेकोरपपणे काम करा.
2. दिवसभरात काही ना काही स्नॅक्स खात राहा.
3. संपूर्ण आणि पौष्टिक आहारा घ्या.
4. दिवसभरात छोटे-छोटे मील्स घ्या.
5. दिवसभरात भरपूर पाणी प्या.
6. कायम ताजे अन्न खा.
7. रोज एक ग्लास दूध घ्या.
8. रोज कोवळ्या सूर्यप्रकाशात वॉकला जा.
9. नियमित डॉक्टरकडे तपासणीला जा.
10. रोज पुरेशी झोप घ्या.
11. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योगा करा.
12. चांगली पुस्तक वाचा, संगीत ऐका आणि पॉझिटिव्ह राहा.

Bloating Remedy: जेवल्यानंतर पोटात तयार होतो गॅस, औषधांपेक्षा अधिक फायदेशीर आहेत या 7 औषधी वनस्पती

कॉफीसोबत हा पदार्थ तुम्ही वापरत आहात तर सावधान…स्किन केअरसाठी कॉफीसोबत हे वापरू नका…

हिवाळ्यात फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर!