Propose Day 2021 | ‘प्रपोज डे’ खास बनवायचाय? मग ‘या’ बॉलिवूड कपल्सच्या आयडिया नक्की ट्राय करा!

व्हॅलेंटाईन वीक (Valentines Week) सुरू झाला आहे. या प्रेमाच्या सप्ताहातला आजचा ‘प्रपोज डे’ (Propose Day) हा दिवस सगळ्याच प्रेमींसाठी खूप खास असतो.

Propose Day 2021 | ‘प्रपोज डे’ खास बनवायचाय? मग ‘या’ बॉलिवूड कपल्सच्या आयडिया नक्की ट्राय करा!
बॉलिवूडच्या लोकप्रिय कपल्सच्या प्रपोज स्टोरी

मुंबई : व्हॅलेंटाईन वीक (Valentines Week) सुरू झाला आहे. या प्रेमाच्या सप्ताहातला आजचा ‘प्रपोज डे’ (Propose Day) हा दिवस सगळ्याच प्रेमींसाठी खूप खास असतो. आजच्या दिवशीच काही लोक आपले प्रेम व्यक्त करतात. याशिवाय प्रेमी जोड्या एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी काही विशेष योजना देखील करतात. तुम्ही देखील अशाच काही योजना आखत असाल, तर आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या लोकप्रिय कपल्सच्या प्रपोज स्टोरीबद्दल सांगणार आहोत, ज्या वाचून तुम्हालाही काही नवीन कल्पना मिळतील (celebrities proposal ideas).

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास बॉलिवूड-हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. जितकी क्युट यांची जोडी आहे, तितकीच क्युट यांची प्रपोज स्टोरी देखील आहे. हॉलिवूड स्टार निक जोनास तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी प्रियंकाला ग्रीकमधील एका बेटावर घेऊन गेला होता आणि तेथेच तिने गुडघ्यावर बसून, अंगठी घेतली आणि प्रियांकाला म्हणाला, “तू जगातील सुंदर स्त्री आहेस, तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल का? आणि मला तुझ्याशी लग्न करून जगातील सगळ्यात आनंदी माणूस बनण्याची संधी देशील का?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या लग्न बरीच वर्षे झाली आहेट, पण आजही हे दोघेही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक आहेत. प्रत्येकाला वाटत असेल की, अभिषेकसारख्या मोठ्या स्टारने ऐश्वर्याला खूप भव्यदिव्य प्रकारे प्रपोज केले असेल, पण तसे तसे नाही. अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही न्यूयॉर्कमध्ये ‘गुरु’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो. मी एक दिवस हॉटेलच्या रूममध्ये उभा होतो आणि विचार करत होतो की एक दिवस आम्ही दोघे लग्न करू. त्यानंतर एका वर्षानंतर आम्ही तिथे गुरुच्या प्रीमिअरसाठी गेलो. प्रीमिअरच्यानंतर आम्ही परत त्याच हॉटेलमध्ये गेलो आणि त्याच बाल्कनीत मी ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केला.

करिना कपूर आणि सैफ अली खान

तुम्हाला माहिती आहे का की, नवाब सैफने करिनाला 2 वेळा प्रपोज केले होते आणि दोन्ही वेळा सैफने पॅरिसमध्ये करिनाला प्रपोज केले होते. पॅरिसमधील रिट्स हॉटेलमध्ये पहिल्यांदा सैफने प्रपोज केला होता. पण करिनाने त्यावेळेस त्याला नकार दिला. त्याच वेळी, त्याने वडील मन्सूर अली खान पतौडी यांनी आई शर्मिलाला ज्या ठिकाणी प्रपोज केले होते, त्याच ठिकाणी सैफने करिनाला पुन्हा प्रपोज केला होता (celebrities proposal ideas).

आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप

आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. कॉलेजपासूनच दोघांचीही मने होती. आयुष्मान लाजाळू होता, परंतु तरीही ताहिरासाठी त्याने कँडल लाईट डिनर डेट आयोजित केली आणि याचवेळी त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली.

बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर

एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर यांची भेट झाली. त्यानंतर दोघे थायलंडला सुट्टीवर गेले होते आणि 31 डिसेंबर रोजी करणने बिपाशाला, मोठी आतिषबाजी करत, रिंग घेऊन प्रपोज केले. यावेळी करण तब्बल 10 मिनिटे गुडघ्यावर बसून होता आणि त्याला पाहून बिपाशा म्हणाली, ‘तुला काय झाले आहे? तुला माझ्याशी लग्न का करायचे आहे? अखेर करणणे बिपाशाचा होकार मिळवलाच.

(celebrities proposal ideas)

हेही वाचा :

Published On - 10:27 am, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI