
भारतात सापाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काही अत्यंत भयानक साप आहे, असे काही साप जे डसताच अवघ्या काही मिनिटांत व्यक्तीचा खेळ खल्लास होऊ शकतो… काही साप असे देखील आहेत, जे काही ठराविक ऋतूंमध्ये देखील दिसतात. खरं तर, सध्या, महाकाय अजगरांपासून होणारा धोका विषारी कोब्रा आणि क्रेट सारख्या सापांपेक्षा जास्त आहे…. पावसाळ्यात शेतात आणि घरांमध्ये विषारी साप दिसायचे, आता हिवाळ्यात अजगर उष्णतेसाठी मोकळ्या जागांवर, अगदी निवासी भागातही पोहोचू लागले आहेत.
अजगर हे थंड रक्ताचे प्राणी आहेत. ते बाह्य वातावरणानुसार त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रित करू शकत नाहीत. म्हणून, हिवाळा सुरू होताच ते उष्ण ठिकाणाच्या शोधात निघतात. दिवसा उन्हाळ्याच्या ठिकाणी, अजगर रस्त्याच्या कडेला, शेताच्या बाजूला आणि अगदी घरांच्या छतावर किंवा मोकळ्या अंगणातही दिसू शकतात.
तज्ज्ञांच्या दिलेल्या माहितीनुसार, थंडीच्या काळात, अजगर सुप्तावस्थेत जाण्यापूर्वी उष्णता मिळवण्यासाठी अनेक तास उन्हात झोपतात. सांगायचं झालं तर, “सर्पभूमी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडवा, बुरहानपूर, खरगोन, हरदा आणि देवास या भागांमध्ये अजगर मुबलक प्रमाणात आढळतात. ते या भागातील शेतात, टेकड्यांमध्ये आणि जंगलात राहतात.
तापमान कमी होऊ लागताच, साप पाण्याच्या बिळांमधून बाहेर पडतात आणि उष्णतेच्या ठिकाणी जातात. ग्रामीण भागातील लोक शेतात काम करताना किंवा रस्त्याच्या कडेला उन्हात अजगरांना पाहून घाबरतात. अजगर सामान्यतः विषारी नसतात, परंतु त्यांचा आकार आणि ताकद इतकी असते की, ते कोणत्याही लहान प्राण्याला किंवा पाळीव प्राण्याला जागीच मारू शकतात.
कोंबड्या, शेळ्या किंवा अगदी लहान पाळीव कुत्रे देखील अजगरांचा शिकार बनतात. सर्वात मोठा धोका तेव्हा उद्भवतो जेव्हा अजगर चुकून घर किंवा शाळांजवळ फिरतात. अशा परिस्थितीत लोक घाबरतात आणि अजगरांना दगड मारु लागतात… तेव्हा साप देखील हल्ला करण्याचा प्रयत्न करतात…
वन विभागाचे तज्ज्ञ कायम एकच महत्त्वाची गोष्ट सांगतात… जर तुम्हाला कधी अजगर किंवा इतर कोणताही साप दिसला तर त्याला मारण्याचा किंवा हाकलण्याचा प्रयत्न करू नका, तर ताबडतोब वन विभागाच्या सर्प बचाव पथकाला किंवा स्थानिक वन कर्मचाऱ्यांना कळवा. कारण ते प्रशिक्षित असतात आणि सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडू शकतात.
भयानक दिसत असूनही, अजगर पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. ते उंदीर, ससे आणि शेतात आढळणाऱ्या इतर लहान प्राण्यांची शिकार करतात, ज्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं आणि शेतकऱ्यांची मदत होते. पर्यावरणीय संतुलन राखण्यात अजगर महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणून त्यांना मारण्याऐवजी त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडणं महत्त्वाचं आहे.