जूनमध्ये आल्हाददायक वातावरण असलेल्या राजस्थानमधील ‘या’ ठिकाणाला आर्वजून द्या भेट

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. आता जर तुम्ही तुमच्या मुलांसोबत कुटुंब सहलीचा प्लॅन आखत असाल तर तुम्ही तुमच्या यादीत राजस्थानचा समावेश करू शकता. हो, जून महिन्यात, राजस्थानमध्ये एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही आल्हाददायक हवामानाचा आनंद घेऊ शकता आणि निसर्ग तसेच वन्यजीवांचा अनुभव घेऊ शकता. हे कोणते ठिकाण आहे ते जाणून घेऊयात...

जूनमध्ये आल्हाददायक वातावरण असलेल्या राजस्थानमधील या ठिकाणाला आर्वजून द्या भेट
Mount Abu
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: May 22, 2025 | 8:16 PM

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये अनेकजण त्यांच्या मुलांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करतात. कडक उन्हापासून दुर थंडगार ठिकाणी जाण्याचा प्लॅन करतात. लोकं अनेकदा त्यांच्या कुटुंबासह थंड ठिकाणी ट्रिपचे नियोजन करतात. जर तुम्हालाही या तीव्र उष्णतेपासून आराम मिळवायचा असेल पण शिमला, मनाली सारख्या हिल स्टेशन्स व्यतिरिक्त काहीतरी एक्सप्लोर करायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण घेऊन आलो आहोत आणि ते म्हणजे राजस्थानचे माउंट अबू. हो, जरी राजस्थान बहुतेकदा वाळवंट, उष्णता आणि किल्ल्यांसाठी ओळखले जाते, तरी माउंट अबू हे या राज्यातील एक सुंदर आणि थंड ठिकाण आहे.

अरवली पर्वतरांगेत वसलेले, हिरव्यागार दऱ्या, शांत तलाव आणि थंड हवामान असलेले माउंट अबू राजस्थानच्या उष्ण हवामानापेक्षा पूर्णपणे वेगळे अनुभव देते. जूनमध्येही येथील हवामान आल्हाददायक राहते, ज्यामुळे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी हे परिपूर्ण बनते. आज या लेखात आम्ही तुम्हाला जून महिन्यात माउंट अबूला का भेट द्यावी, तिथे काय पाहण्यासारखे आहे आणि तुम्ही तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना एका संस्मरणीय सहलीत कसे बदलू शकता हे सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात…

आल्हाददायक हवामानाचा आनंद घ्या

माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे, जे समुद्रसपाटीपासून सुमारे 1,220 मीटर उंचीवर आहे. जूनमध्ये, जेव्हा राजस्थानचा उर्वरित भाग तापलेला असतो, तेव्हा माउंट अबूचे तापमान 23°C ते 30°C दरम्यान राहते. येथील थंड वारा, हलका पाऊस आणि हिरवळ उष्णतेपासून आराम देते. म्हणूनच उन्हाळ्यात कुटुंबासह आणि कप्लस करिता हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे.

माउंट अबूमध्ये काय पहावे?

दिलवारा मंदिराला भेट द्या – माउंट अबूचे मुख्य आकर्षण म्हणजे दिलवारा मंदिर. ही प्राचीन जैन मंदिरे त्यांच्या संगमरवरी कोरीवकाम आणि सुंदर कलाकृतींसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. या मंदिरांच्या भिंती आणि छतावरील सुरेख कोरीवकाम पाहण्यासारखे आहे.

नक्की तलाव – माउंट अबूचा नक्की तलाव हा एक अतिशय सुंदर तलाव आहे जिथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. तलावाकाठी फिरणे, सूर्यास्त पाहणे आणि जवळच्या कॅफेमध्ये चहा पिणे हा एक आरामदायी अनुभव आहे.

हनिमून पॉइंट आणि सनसेट पॉइंट – या दोन्ही व्ह्यूपॉइंट वरून अरवली टेकड्यांचे दृश्य खूप सुंदर दिसते. जून महिन्याच्या संध्याकाळी, विशेषतः सनसेट पॉइंटवर, डोंगरांच्या मागे सूर्यास्त पाहणे हा एक संस्मरणीय क्षण असतो.

गुरु शिखर – गुरु शिखर हे अरवलीचे सर्वात उंच शिखर आहे आणि येथून माउंट अबू आणि आजूबाजूच्या परिसराचे दृश्य खूप आकर्षक दिसते. येथे एक मंदिर देखील आहे जे अध्यात्म आणि शांतीचा अनुभव देते.

वन्यजीव आणि निसर्ग एक्सप्लोर करा- माउंट अबू येथील वन्यजीव अभयारण्यात अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी दिसतात. येथे ट्रेकिंग आणि जंगल सफारीचा आनंदही घेता येतो.

माउंट अबूला कसे पोहोचायचे?

जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल, तर माउंट अबूचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन ‘अबू रोड’ आहे, जे सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे. विमानाने जाण्यासाठी तुम्हाला उदयपूर विमानतळावर उतरावे लागेल. याशिवाय, उदयपूर, अहमदाबाद आणि जयपूर सारख्या शहरांमधून बस किंवा टॅक्सीने रस्त्याने सहज पोहोचता येते.