
आपल्यापैकी बहुतेकांना चॉकलेट खायला खूप आवडते. तसेच आपल्या भारतात प्रत्येक सणाला नात्यांमध्ये गोडवा वाढवण्यासाठी मिठाई दिली जाते. तर ही मिठाई वेगवेगळ्या फ्लेवरची असते. अशातच काही दिवसांनी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या खास सणानिमित्त तुम्ही तुमच्या भावाला चॉकलेट सरप्राईज देखील देऊ शकता. तसेच बाजारातून मिठाई खरेदी करण्याऐवजी घरी चॉकलेट मिठाई तयार करा. या लेखात आपण चॉकलेट मिठाई बनवण्याची रेसिपी जाणून घेऊ जी बनवणे फार सोप्पी आहे.
रक्षाबंधन हा सण प्रत्येक बहिण भावांसाठी खास असतो. तर रक्षाबंधन हा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे, त्यामुळे तुम्ही एक दिवस आधी चॉकलेट मिठाई तयार करू शकता आणि ती खराब होण्याची भीती नाही. तुम्ही ती सहजपणे फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी.
पारंपारिक मिठाईंमध्ये एक ट्विस्ट आहे
रक्षाबंधन या सणानिमित्त आम्ही तुम्हाला ज्या गोड मिठाईची रेसिपी सांगणार आहोत ती प्रत्यक्षात एक पारंपारिक मिठाईचा पदार्थ आहे, त्याला चॉकलेटने नुकताच एक नवीन ट्विस्ट देण्यात आला आहे. या गोड पदार्थाचे नाव पेढा आहे जे बहुतेक लोकांचे आवडते आहे. चला तर मग ते बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.
चॉकलेट पेढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
तुम्हाला एक कप मावा (घरी बनवलेला मावा अधिक चविष्ट आणि शुद्ध)
1 चमचा कोको पावडर
एक चमचा तूप
गरजेनुसार थोडे दूध
अर्धा कप पिठीसाखर
पिस्ता, बदाम आणि काजू
चॉकलेट पेढा कसा बनवायचा?
सर्वप्रथम एका पॅनमध्ये मावा घ्या आणि मंद आचेवर तो सोनेरी होईपर्यंत सतत परतत रहा. जर तुम्ही घरी मावा बनवला असेल तर तो परतण्याची गरज नाही.
यानंतर या माव्यात कोको पावडर आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोडव्यानुसार पिठीसाखर टाका आणि सतत ढवळत राहा. यामुळे साखर विरघळेल.
काहीवेळाने आता यामध्ये थोडे दूध मिक्स करा. तसेच त्यात थोडे तूप टाका ज्यामुळे चव आणखी वाढेल.
मिश्रण पॅनपासून वेगळे होऊ लागले की, गॅस बंद करा, परंतु तरीही मिश्रण 30 सेकंद ढवळत राहा.
पेढा बनवण्याचा शेवटचा टप्पा
मावा थंड झाल्यावर हातावर देशी तूप लावा आणि छोटे गोळे बनवा, त्यांना थोडे पेढ्यांचा आकार द्या. सर्व पेढे तूप लावलेल्या प्लेटमध्ये ठेवा. यानंतर, तुम्ही बदाम, पिस्ता किंवा काजूच्या मधून दोन काप करा आणि प्रत्येक पेढ्यावर एक काजू किंवा बदाम ठेवा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही काजू बारीक करून मिश्रणात टाकू शकता. यामुळे पेढ्याला एक अद्भुत कुरकुरीतपणा येईल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पेढ्याला चॉकलेटने कोटिंग करू शकता. यासाठी चॉकलेट डबल बॉयलरमध्ये मेल्ट करा आणि नंतर एका वेळी एक पेढा यात चॉकलेट मध्ये बुडवा. यानंतर काही मिनिटांसाठी तसेच ठेवा. अशा पद्धतीने चॉकलेट पेढा तयार आहे.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)