चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करायचे आहेत?; तांदळाच्या पीठाचे फायदे वाचाच

| Updated on: Jun 07, 2021 | 9:18 AM

सुंदर आणि चमकदार चेहरा कोणाला नको असतो. त्वचेला नैसर्गिकरित्या सुंदर बनवण्यासाठी आपण घरगुती उपाय केले पाहिजेत.

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करायचे आहेत?; तांदळाच्या पीठाचे फायदे वाचाच
तांदळाचे पीठ
Follow us on

मुंबई : सुंदर आणि चमकदार चेहरा कोणाला नको असतो. त्वचेला नैसर्गिकरित्या सुंदर बनवण्यासाठी आपण घरगुती उपाय केले पाहिजेत. यामुळे आपली त्वचा नेहमीसाठीच चांगली राहते. विशेष म्हणजे हे घरगुती उपाय करण्यासाठी पैसे आणि वेळही लागत नाही. आज आम्ही तुम्हाला सुंदर त्वचा होण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. (Rice flour is extremely beneficial for the skin)

आपल्या त्वचेसाठी तांदळाचे पीठ अत्यंत फायदेशीर असते. तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या उपचारांसाठीही वापरले जातात. तांदळाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा तांदळाचे जाडसर पीठ आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर स्क्रबप्रमाणे लावा आणि काहीवेळाने धुवून टाका.

जर, आपली त्वचा तेलकट असेल, तर तांदळाचे पीठ आणि ग्रीन टीचा फेस पॅक आपल्या त्वचेसाठी खूप चांगला ठरेल. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा ग्रीन टी आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट आपल्या चेहऱ्यावर किमान 15 मिनिटे लावून ठेवा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे मुरुम आणि डागांच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. तसेच, त्वचा चमकदार होईल.

तांदळाच्या पिठामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन डीसह फायबरची मात्रा भरपूर आहे. तसंच यामध्ये अतिरिक्त प्रमाणात लोह व थायमीन यासारख्या पोषक घटकांचाही समावेश असतो. या सर्व पोषण तत्त्वांमुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते. दोन चमचे तांदळाचे पीठ, एक चमचा बटाट्याची पेस्ट, एक चमचा ऑलिव्ह ऑइल सर्व सामग्री एकत्रित करून स्क्रब तयार करा. ही पेस्ट मान व चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने आपल्या चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. या स्क्रबच्या वापरामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Rice flour is extremely beneficial for the skin)