थंडीत उष्णतेसाठी हीटर; वापरण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाचे धोके

| Updated on: Dec 20, 2021 | 11:52 PM

थंडीपासून बचावासाठी उष्णतावर्धक कपड्यांचा वापर तसेच लोकरीपासून बनविलेल्या चादरीत अनेकजण पहुडलेले दिसतात. तर अनेक जण थंडीच्या काळात घरात हीटरचा वापर करताना दिसून येतात. उष्णता निर्माण करणाऱ्या हीटरचा अधिक काळ संपर्क आल्यास आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

थंडीत उष्णतेसाठी हीटर; वापरण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाचे धोके
Follow us on

नवी दिल्ली : हिवाळ्यात (Winter) तापमानाच्या पाऱ्यात चढ-उतार नोंदवला जातो. तापमानाचा पारा आणखी खालावल्यास हाडं गोठविणाऱ्या थंडीचा सामना करावा लागतो. थंडीपासून बचावासाठी उष्णतावर्धक कपड्यांचा वापर तसेच लोकरीपासून बनविलेल्या चादरीत अनेकजण पहुडलेले दिसतात. तर अनेक जण थंडीच्या काळात घरात हीटरचा (Room Heater) वापर करताना दिसून येतात. उष्णता निर्माण करणाऱ्या हीटरचा अधिक काळ संपर्क आल्यास आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

हीटर नेमकं कसं काम करतं?

हीटरची निर्मिती इलेक्ट्रॉनिक तंत्राचा अवलंब करून केली जाते. सिरॕमिक धातूपासून बनविलेल्या पट्ट्या हीटरमध्ये वापरण्यात येतात. उष्णता प्रसारता गुणधर्म असलेल्या सिरॕमिक मधून उष्णता बाहेर फेकली जाते. तसेच हवेतील आद्रतेचे शोषण
केले जाते.

हीटरमुळे आरोग्याची हानी

हीटरमुळे बाहेर फेकली जाणारी हवा मोठ्या प्रमाणात शुष्क स्वरुपाची असते. त्वचा कोरडी पडणे, अपुरी झोप, डोकेदुखी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. हॕलोजन हीटर किंवा ब्लोअरचा अधिक वापर केल्यामुळे तुम्ही आजारी पडण्याचा धोका संभावतो. अस्थमा किंवा श्वसन विकारग्रस्त रुग्णांसाठी हीटरची हवा अधिकच हानिकारक ठरते.

‘या’ व्यक्ती हीटरपासून दूर

श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींनी हीटरपासून ठराविक अंतर ठेवायला हवे. हीटरची हवा श्वसनमार्गात गेल्याने कफ होण्याची शक्यता असते. त्यामुळे खोकला तसेच सर्दीने तुम्ही ग्रासले जाऊ शकतात. शरीरात गेलेला कफ शुष्क झाल्याने तुम्हाला प्रतिजैविके घ्यावे लागतील.

‘अॕलर्जी’ स्पेशल हीटर

आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार श्वसनविकारांची अॕलर्जी असलेल्या व्यक्तींसाठी विशिष्ट प्रकारच्या हीटरची रचना केलेली असते. अशाप्रकारच्या हीटरमध्ये आॉईलचा वापर केलेला असतो. हीटरमध्ये आॉईलचा वापर केल्याने हवा शुष्क होण्याची शक्यता टळते. तुम्ही सलग हीटरचा वापर करत असल्यास थोड्यावेळासाठी हीटरचा वापर बंद ठेवा.

गॕस हीटरपासून सावधान

गॕस किंवा सीएनजी संचलित हीटर बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या गटाने केलेल्या अभ्यासानुसार सीएनजी किंवा गॕस हीटरचा वापर करणाऱ्या घरातील लहान मुलांत श्वसनाचे विकार अधिक प्रमाणात आढळतात. सर्दी,खोकला,श्वसनास त्रास, फुफ्फुसांना हानी यासारखे आजारही उद्भवू शकतात. गॕस हीटरमधून बाहेर पडणारा कार्बन मोनॉक्साइड लहान बालके तसेच ज्येष्ठ नागरिकांना अपायकारक ठरतो. तसेच हीटरला कधीही कपड्यांच्या संपर्कात ठेऊ नये. त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते.

इतर बातम्या :

MHADA Examination : पेपर फुटीनंतर आता म्हाडा परीक्षेची नवी तारीख जाहीर, कधी होणार परीक्षा?

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात उभी फूट! अजय गुजर प्रणित संघटनेची संप मागे घेतल्याची घोषणा